भारतीय संघ घरच्या मैदानात इंग्लंड विरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिकेत सूर्यकुमार यादव वर्सेस जोस बटलर यांच्यात रंगणारा सामनाही खास असेल. टी-२० क्रिकेटमध्ये अनेक स्फोटक फलंदाज आहेत. त्यातील आघाडीच्या फलंदाजांच्या यादीत सूर्यकुमार यादव आणि जोस बटलरचा समावेश होता.
सूर्या वर्सेस बटलर यांच्यात पाहायला मिळेल वेगळी अन् खास लढत
एका बाजूला भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरेल. दुसरीकडे इंग्लंडचा संघ बटलरच्या कॅप्टन्सीत या मालिकेत धमाका करण्यास सज्ज असेल. दोन्ही संघातील मालिकेआधी आकडेवारीच्या आधारे जाणून घेऊयात सूर्यकुमार यादव अन् बटलर यांच्यात कोण आहे सर्वात भारी त्यासंदर्भातील खास स्टोरी
सूर्यकुमार यादवची आंतरराष्ट्रीय टी-२०तील कामगिरी
३४ वर्षीय सूर्यकुमार यादवनं आपला पहिला आंतरराष्ट्रीय टी २० सामना हा इंग्लंड विरुद्धच खेळला होता. आतापर्यंत त्याने ७८ सामने खेळले असून ४०.०९ च्या सरासरीसह १६७.८६ च्या स्ट्राइक रेटनं त्याने २५७० धावा केल्या आहेत. यात ४ शतकासह २१ अर्धशतकांचा समावेश आहे.
जोस बटलरची टी-२० तील कामगिरी
सूर्यकुमार यादवच्या तुलनेत बटलरनं खूप आधी टी-२० क्रिकेटला सुरुवात केली. २०११ मध्ये पहिला टी-२० सामना खेळणाऱ्या बटलरनं आतापर्यंत १२९ टी-२० सामने खेळले असून ३५.६७ च्या सरासरीसह त्याच्या खात्यात ३३८९ धावा जमा आहेत. बटलरनं या धावा १४७ च्या स्ट्राइक रेटनं काढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या या स्टार बॅटरच्या खात्यात एक शतक आणि २५ अर्धशतकांची नोंद आहे.
सूर्यकुमार यादव वर्सेस जोस बटलर कॅप्टन्सीचा रेकॉर्ड
जोस बटलरनं आतापर्यंतक ४६ टी-२० सामन्यात इंग्लंड संघाचे नेतृत्व केले आहे. यात २५ सामन्यात संघाला विजय मिळाला असून १८ पराभवासह ३ सामने अनिर्णित राहिले आहेत. बटलरची कॅप्टन्सीतील विजयाची टक्केवारी ही ५३.३४ अशी आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १७ पैकीस १३ साने जिंकले आहेत. फक्त ३ सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला असून एक सामना अनिर्णित राहिला आहे. सूर्याचे विनिंग पर्सेंटेज ७६.४७ इतके आहे. ही आकडेवारी कॅप्टन्सीच्या बाबतीत सूर्याला बटलरपेक्षा भार ठरवणारी आहे.