नवी दिल्ली : आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) या बहुचर्चित स्पर्धेत भारतीय संघाने विजयाने आपल्या अभियानाची सुरूवात केली आहे. पहिल्याच सामन्यात आपल्या कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला नमवून भारताने ही किमया साधली. या सामन्यात अष्टपैलू हार्दिक पांड्याने शानदार कामगिरी करून विजय खेचून आणला. आता भारताचा पुढील सामना बुधवारी 31 ऑगस्ट रोजी हॉंगकॉंगविरूद्ध होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज के.एल राहुलच्या (KL Rahul) खेळीवर सर्वांचे लक्ष असणार आहे. भारतीय संघासाठी हा सामना चांगल्या सराव सत्रासारखाच असेल. खरं तर हाँगकाँगच्या संघातील खेळाडूंना भारतीय खेळाडूंच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव खूप कमी आहे.
लयनुसार खेळण्याचे राहुलसमोर आव्हान
भारताचा सलामीवीर के.एल राहुल हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यातून फॉर्ममध्ये परतण्याचा प्रयत्न करेल. या सामन्यात दोन्ही सलामीवीर फलंदाजांना शानदार सुरूवात करण्याची गरज आहे, कारण रोहित शर्मा आणि के.एल राहुल या दोघांनाही पाकिस्तानविरूद्ध धावा करता आल्या नव्हत्या. याशिवाय भारताचा महान फलंदाज विराट कोहली देखील कशी कामगिरी करतो हे पाहण्याजोगे असेल.
ऋषभ पंतला मिळू शकते संधी
हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यातून ऋषभ पंतचे भारतीय संघात पुनरागमन होऊ शकते. या सामन्यात त्याला दिनेश कार्तिकच्या जागी संधी मिळू शकते. पंत भारतीय संघाच्या मधल्या फळीत महत्त्वाचा चेहरा आहे, मात्र पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात त्याच्या ऐवजी दिनेश कार्तिकला संधी मिळाली होती. पंतशिवाय कर्णधार रोहित शर्मा रविचंद्रन अश्विनचा संघात समावेश करू शकतो. आर अश्विनचा अनुभव पाहता त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.
अशी असू शकते प्लेइंग XI
रोहित शर्मा (कर्णधार), के.एल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल.
Web Title: IND vs HK likely Big change to the Indian squad for against Hong Kong, Know the Playing XI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.