IND vs IRE 1st T20I - भारत-आयर्लंड यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेला आजपासून सुरूवात झाली. ११ महिन्यानंतर जसप्रीत बुमराहचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन झाले आणि तेही कर्णधार म्हणून... बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला अन् रिंकू सिंग व प्रसिद्ध कृष्णा यांना पदार्पणाची कॅप दिली. बुमराहचा पहिलाच चेंडू आयर्लंडच्या सलामीवीराने चौकार खेचला, परंतु पुढच्या चेंडूवर बुमराहने त्याचा दांडा उडवला. त्यानंतर त्याने पहिल्या षटकात आणखी एक धक्का देत आयर्लंडची अवस्था २ बाद ४ धावा अशी केली.
भारताचा तो ट्वेंटी-२० संघाचा ११वा कर्णधार आहे. दक्षिण आफ्रिका ( १५) आणि वेस्ट इंडिज ( १३) यांनी सर्वाधिक कर्णधार बनवले आहेत. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांनी ट्वेंटी-२०त ११ कर्णधार वापरून पाहिले. कृष्णाही दुखापतीतून सावरून पुनरागमन करत आहे आणि जसप्रीतसह त्याच्याही कामगिरीवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. आशियाई स्पर्धेपूर्वीची भारताच्या युवा खेळाडूंना या मालिकेत चांगली तयारी करता येणार आहे. अँडी बालबर्नीने पहिलाच चेंडू चौकार खेचला. पण, बुमराहने त्याला पुढच्याच चेंडूवर अचंबित केले. बुमराहने टाकलेला चेंडू अँडीच्या बॅटची किनार घेत यष्टींवर आदळला. त्यानंतर पाचव्या चेंडूवर लॉर्कन टकरचा बुमराहने झेलबाद केले. भारताकडून ट्वेंटी-२० क्रिकेटमधील त्याची ही ७२वी विकेट ठरली अन् त्याने आर अश्विनची बरोबरी केली. युझवेंद्र चहल ( ९६), भुवनेश्वर कुमार ( ९०) आणि हार्दिक पांड्या ( ७३) हे आघाडीवर आहेत.
भारताचा संघ - जसप्रीत बुमराह, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई.
Web Title: IND vs IRE 1st T20I Live Marathi : 4, W, 0, 0, W, 0! Jasprit Bumrah is back, He gets a 2wickets in first over in his return, IRE 4/2, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.