IND vs IRE 1st T20I - भारतीय संघाने जसप्रीत बुमराहाच्या नेतृत्वाखाली पहिली ट्वेंटी-२० मॅच जिंकली. बुमराहसह रवी बिश्नोई व प्रसिद्ध कृष्णा यांनी चांगली गोलंदाजी केली. बॅरी मॅकार्थीच्या फटकेबाजीने आयर्लंडला १३९ धावांपर्यंत पोहोचवले, भारताकडून ऋतुराज गायकवाड व यशस्वी जैस्वाल यांनी चांगली सुरुवात केली. पण, २ चेंडूंत २ विकेट्स पडल्याने मॅचला कलाटणी मिळाली. तरीही ४७ धावा करून भारताने बाजी मारली आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
ऋतुराज गायकवाड व यशस्वी जैस्वाल यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. सुरुवातीला ऋतुराज रन आऊट होता होता वाचला. पण, त्यानंतर दोन्ही सलामीवीरांनी सावध खेळ केला. पावसाच्या शक्यतेमुळे भारताला ५ षटकांत २७ धावा करायच्या होत्या आणि ऋतुराजने षटकार खेचून भारताला तो पल्ला गाठून दिला. या दोघांची ४६ धावांची भागीदारी क्रेग यंगने तोडली. यशस्वी ( २४) झेलबाद झाला अन् त्यानंतर तिलक वर्माही गोल्डन डकवर माघारी परतला. भारताने ६.५ षटकांत २ बाद ४७ धावा केल्या आणि पावसामुळे सामना थांबवण्यात आला. भारतीय संघ DLS नुसार २ धावांनी आघाडीवर होता आणि अखेरीस पाऊस कायम राहिल्याने भारताला विजयी घोषित केले गेले. ( यशस्वी व तिलक यांच्या विकेट्स )