IND vs IRE 1st T20I - भारत-आयर्लंड यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेला आजपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेपेक्षा सर्वांना आतुरता आहे, ती जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) याच्या पुनरागमनाची... ११ महिन्यानंतर 'लॉर्ड ऑफ स्विंग' बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला मैदानावर उतरणार आहे. दुखापतीमुळे त्याला आशिया चषक, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, बॉर्डर गावस्कर ट्रॉफी, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल... आदी महत्त्वांच्या स्पर्धांना मुकावे लागले होते. कर्णधार जसप्रीतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
भारताचा तो ट्वेंटी-२० संघाचा ११वा कर्णधार आहे. दक्षिण आफ्रिका ( १५) आणि वेस्ट इंडिज ( १३) यांनी सर्वाधिक कर्णधार बनवले आहेत. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांनी ट्वेंटी-२०त ११ कर्णधार वापरून पाहिले. तो म्हणाला, पुन्हा मैदानावर उतरून आनंद होतोय.. एक जलदगती गोलंदाज म्हणून मला विकेट घ्यायला आवडेल आणि खेळपट्टी तशी दिसतेय.. आज रिंकू सिंग व प्रसिद्ध कृष्णा पदार्पण करत आहेत. मी त्यांना या क्षणाचा आनंद लुटण्याचा सल्ला दिलाय.''