भारतीय गोलंदाजांनी चमक दाखवली, पण आयर्लंडनेही फटकेबाजी करून मॅच फिरवली

IND vs IRE 1st T20I - जसप्रीत बुमराहच्या ( Jasprit Bumrah) नेतृत्वाखाली भारतीय संघाने सुरुवात चांगली करताना निम्मा संघ ३१ धावांवर तंबूत पाठवला, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 09:09 PM2023-08-18T21:09:09+5:302023-08-18T21:10:45+5:30

whatsapp join usJoin us
IND vs IRE 1st T20I Live Marathi : Ireland 59/6 in big trouble, Then came Barry McCarthy and smashed 51* runs from just 33 balls including 4 fours & 4 sixes, Ireland post 139-7 | भारतीय गोलंदाजांनी चमक दाखवली, पण आयर्लंडनेही फटकेबाजी करून मॅच फिरवली

भारतीय गोलंदाजांनी चमक दाखवली, पण आयर्लंडनेही फटकेबाजी करून मॅच फिरवली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs IRE 1st T20I - जसप्रीत बुमराहच्या ( Jasprit Bumrah) नेतृत्वाखाली भारतीय संघाने सुरुवात चांगली करताना निम्मा संघ ३१ धावांवर तंबूत पाठवला. बुमराह, रवी बिश्नोई व पदार्पणवीर प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. मात्र, कर्टीस कॅम्फर व बॅरी मॅकार्थी यांनी चौकार-षटकार खेचून आयर्लंडला सामन्यात पुनरागमन करून दिले. या दोघांनी अखेरच्या षटकांत चांगली फटकेबाजी करून भारतासमोर आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. 

Jasprit Bumrahचा विक्रम! भारताने याच महिन्यात दोनदा केला असा पराक्रम, आयर्लंडचा निम्मा संघ तंबूत


कर्णधारने पहिल्याच षटकात दोन धक्के दिले. त्याला रवी बिश्नोई व पदार्पणवीर प्रसिद्ध कृष्णा यांची साथ मिळाली. अँडी बालबर्नीने पहिलाच चेंडू चौकार खेचला. पण, बुमराहने पुढच्याच चेंडूवर त्याचा त्रिफळा उडवला. पाचव्या चेंडूवर लॉर्कन टकरचा बुमराहने झेलबाद केले. हॅरी टेक्टर आणि पॉल स्टर्लिंग यांनी आयर्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पदार्पणवीर प्रसिद्ध कृष्णाने यजमानांना दोन धक्के दिले. त्याने हॅरी टेक्टर ( ९) व जॉर्ज डॉक्रेल ( १) यांना बाद केले. रवी बिश्नोईने गुगलीवर स्टर्लिंगचा ( ११) त्रिफळा उडवल्याने आयर्लंडची अवस्था ५ बाद ३१ अशी केली होती. 


 


ट्वेंटी-२० त पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांत बुमराहने ( २३) दुसरे स्थान पटकावले. भुवनेश्वरने ४७ विकेट्स घेतल्या आहेत. अर्शदीप सिंग (२१), आर अश्विन ( १६), आशिष नेहरा ( १५) व वॉशिंग्टन सुंदर ( १५) यांचा क्रमांक नंतर येतो. ११व्या षटकात बिश्नोईने अचूक DRS घेताना मार्क एडरला ( १६) पायचीत केले. बिश्नोईने ४-०-२३-२ अशी स्पेल टाकली. कर्टीस कॅम्फर व बॅरी मॅकार्थी यांनी आयर्लंडची गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न केला. कॅम्फरने १६व्या षटकात बुमराहच्या गोलंदाजीवर १३ धावा चोपल्या. कॅम्फर आणि मॅकार्थी यांनी ४४ चेंडूंत ५७ धावांची भागीदारी केली. प्रसिद्धच्या ( २-३२) चौथ्या षटकात मॅकार्थीने १५ धावा कुटल्या. 


अर्शदीप सिंगने १८व्या षटकात कॅम्परचा ३९ धावांवर ( ३३ चेंडू, ३ चौकार व १ षटकार) त्रिफळा उडवला. जसप्रीतने त्याच्या चार षटकांत २४ धावा देत २ विकेट्स घेतल्या. मॅकार्थीने अखेरच्या षटकात चांगली फटकेबाजी करून ट्वेंटी-२० कारकीर्दितील त्याची सर्वोत्तम धावसंख्या उभारली. मॅकार्थीने ३३ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकार खेचून नाबाद ५१ धावा केल्या. त्याने डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार खेचून संघाला ७ बाद १३९ धावांपर्यंत पोहोचवले.

Web Title: IND vs IRE 1st T20I Live Marathi : Ireland 59/6 in big trouble, Then came Barry McCarthy and smashed 51* runs from just 33 balls including 4 fours & 4 sixes, Ireland post 139-7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.