IND vs IRE 1st T20I - जसप्रीत बुमराहच्या ( Jasprit Bumrah) नेतृत्वाखाली भारतीय संघाने सुरुवात चांगली करताना निम्मा संघ ३१ धावांवर तंबूत पाठवला. बुमराह, रवी बिश्नोई व पदार्पणवीर प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. मात्र, कर्टीस कॅम्फर व बॅरी मॅकार्थी यांनी चौकार-षटकार खेचून आयर्लंडला सामन्यात पुनरागमन करून दिले. या दोघांनी अखेरच्या षटकांत चांगली फटकेबाजी करून भारतासमोर आव्हानात्मक लक्ष्य उभे केले.
Jasprit Bumrahचा विक्रम! भारताने याच महिन्यात दोनदा केला असा पराक्रम, आयर्लंडचा निम्मा संघ तंबूत
कर्णधारने पहिल्याच षटकात दोन धक्के दिले. त्याला रवी बिश्नोई व पदार्पणवीर प्रसिद्ध कृष्णा यांची साथ मिळाली. अँडी बालबर्नीने पहिलाच चेंडू चौकार खेचला. पण, बुमराहने पुढच्याच चेंडूवर त्याचा त्रिफळा उडवला. पाचव्या चेंडूवर लॉर्कन टकरचा बुमराहने झेलबाद केले. हॅरी टेक्टर आणि पॉल स्टर्लिंग यांनी आयर्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पदार्पणवीर प्रसिद्ध कृष्णाने यजमानांना दोन धक्के दिले. त्याने हॅरी टेक्टर ( ९) व जॉर्ज डॉक्रेल ( १) यांना बाद केले. रवी बिश्नोईने गुगलीवर स्टर्लिंगचा ( ११) त्रिफळा उडवल्याने आयर्लंडची अवस्था ५ बाद ३१ अशी केली होती.
अर्शदीप सिंगने १८व्या षटकात कॅम्परचा ३९ धावांवर ( ३३ चेंडू, ३ चौकार व १ षटकार) त्रिफळा उडवला. जसप्रीतने त्याच्या चार षटकांत २४ धावा देत २ विकेट्स घेतल्या. मॅकार्थीने अखेरच्या षटकात चांगली फटकेबाजी करून ट्वेंटी-२० कारकीर्दितील त्याची सर्वोत्तम धावसंख्या उभारली. मॅकार्थीने ३३ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकार खेचून नाबाद ५१ धावा केल्या. त्याने डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार खेचून संघाला ७ बाद १३९ धावांपर्यंत पोहोचवले.