IND vs IRE 1st T20I - जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली ( Jasprit Bumrah) भारतीय संघाने दमदार कामगिरी केली. कर्णधारने पहिल्याच षटकात दोन धक्के दिल्यानंतर रवी बिश्नोईने महत्त्वाची विकेट मिळवली. पदार्पणवीर प्रसिद्ध कृष्णानेही दोन विकेट घेत आयर्लंडची अवस्था ५ बाद ३१ अशी दयनीय केली.
4, W, 0, 0, W, 0! Jasprit Bumrah ने पहिल्याच षटकात घेतल्या दोन विकेट्स, Video
भारत-आयर्लंड पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात कर्णधार जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ११ महिन्यानंतर बुमराहचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन झाले. रिंकू सिंग व प्रसिद्ध कृष्णा यांना पदार्पणाची कॅप दिली. बुमराहने पहिल्याच षटकात दोन विकेट्स घेत दमदार सुरुवात केली. अँडी बालबर्नीने पहिलाच चेंडू चौकार खेचला. पण, बुमराहने त्याला पुढच्याच चेंडूवर त्याचा त्रिफळा उडवला. पाचव्या चेंडूवर लॉर्कन टकरचा बुमराहने झेलबाद केले. भारताकडून ट्वेंटी-२० क्रिकेटमधील त्याची ही ७२वी विकेट ठरली अन् त्याने आर अश्विनची बरोबरी केली. युझवेंद्र चहल ( ९६), भुवनेश्वर कुमार ( ९०) आणि हार्दिक पांड्या ( ७३) हे आघाडीवर आहेत.
भारतासाठी ट्वेंटी-२०त पहिल्याच षटकात दोन विकेट्स घेणारा बुमराह हा चौथा गोलंदाज ठरला. यापूर्वी आर अश्विन ( वि. श्रीलंका, २०१६), भुवनेश्वर कुमार ( वि. अफगाणिस्तान, २०२२) आणि हार्दिक पांड्या ( वि. वेस्ट इंडिज, २०२३) यांनी असा पराक्रम केला होता. हॅरी टेक्टर आणि पॉल स्टर्लिंग यांनी आयर्लंडचा डाव काहीकाळ सावरला, परंतु पदार्पणवीर प्रसिद्ध कृष्णाने यजमानांना तिसरा धक्का दिला. अपर कट मारण्याच्या प्रयत्नात हॅरी टेक्टर ( ९) झेलबाद झाला. पुढच्याच षटकात रवी बिश्नोईने गुगलीवर स्टर्लिंगचा ( ११) त्रिफळा उडवला. प्रसिद्धने आणखी एक विकेट घेत आयर्लंडची ५ बाद ३१ धावा अशी अवस्था केली.