IND vs IRE 1st T20I - चांगल्या सुरुवातीनंतर भारतीय संघाला दोन चेंडूंत दोन धक्के बसले आणि आयर्लंडने सामन्यात डोकं वर काढले. पण, पावसामुळे खेळ थांबल्याने सर्व गणित बिघडले आहे. अशात पुढे सामना सुरू न झाल्यास कोणाचा विजय होईल, हे गणित समोर आले आहे.
आयर्लंडचा निम्मा संघ ३१ धावांवर तंबूत पाठवला. पण, कर्टीस कॅम्फर व बॅरी मॅकार्थी यांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून संघाला पुनरागमन करून दिले. जसप्रीतने पहिल्या षटकात दोन धक्के दिल्यानंतर रवी बिश्नोई व प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. आयर्लंडची अवस्था ५ बाद ३१ अशी केली होती आणि ते शतकी पल्लाही गाठू शकत नाही असे वाटत होते. पण. कॅम्फर आणि मॅकार्थी यांनी ४४ चेंडूंत ५७ धावांची भागीदारी केली. कॅम्फरने ३९ धावा ( ३३ चेंडू, ३ चौकार व १ षटकार) केल्या. मॅकार्थीने ३३ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकार खेचून नाबाद ५१ धावा केल्या. त्याने डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार खेचून संघाला ७ बाद १३९ धावांपर्यंत पोहोचवले. अर्शदीपच्या २०व्या षटकात मॅकार्थीने २२ धावा कुटल्या.
ऋतुराज गायकवाड व यशस्वी जैस्वाल यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. पण, दुसऱ्याच षटकात दोघांमध्ये गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. यशस्वीने एक धावेसाठी कॉल दिला, परंतु ऋतुराजने त्याला माघारी जाण्यास सांगितले. पण, तोपर्यंत यशस्वी नॉन स्ट्रायकर एंडपर्यंत पोहोचला होता. दोन्ही फलंदाज एकाच एंडला असूनही आयर्लंडच्या खेळाडूंना विकेट मिळवता आली नाही. पावसाच्या शक्यतेमुळे भारताला ५ षटकांत २७ धावा करायच्या होत्या आणि ऋतुराजने षटकार खेचून भारताला तो पल्ला गाठून दिला. या दोघांची ४६ धावांची भागीदारी क्रेग यंगने तोडली. यशस्वी ( २४) झेलबाद झाला अन् त्यानंतर तिलक वर्माही गोल्डन डकवर माघारी परतला. भारताने ६.५ षटकांत २ बाद ४७ धावा केल्या आणि पावसामुळे सामना थांबवण्यात आला.
Web Title: IND vs IRE 1st T20I Live Marathi : UPDATE - Rain stops play here in the 1st T20I, India are two runs ahead on DLS.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.