२ तास होत आले तरी भारत-आयर्लंड मॅच सुरू नाही झाली; BCCI ने दिले मोठे अपडेट्स

IND vs IRE 3rd T20I Live Marathi : जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 08:54 PM2023-08-23T20:54:17+5:302023-08-23T20:54:26+5:30

whatsapp join usJoin us
IND vs IRE 3rd T20I Live Marathi : Update: The drizzle hasn't stopped yet. No overs lost so far but we we will start losing overs from 9:15 PM IST | २ तास होत आले तरी भारत-आयर्लंड मॅच सुरू नाही झाली; BCCI ने दिले मोठे अपडेट्स

२ तास होत आले तरी भारत-आयर्लंड मॅच सुरू नाही झाली; BCCI ने दिले मोठे अपडेट्स

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs IRE 3rd T20I Live Marathi : जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आयर्लंडविरुद्धच्या आजच्या तिसऱ्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये बेंच स्ट्रेंथमधील खेळाडूंना संधी मिळण्याची अपेक्षा आहे. या लढतीपूर्वी भारतीय संघाने Chandrayaan 3 च्या यशाचे सेलिब्रेशन केले. भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ वाजता टॉस होणं अपेक्षित होतं, परंतु आता जवळपास २ तास होत आले तरी सामना सुरू झालेला नाही. BCCI ने त्याबाबत मोठे अपडेट्स दिले आहेत.


दुसऱ्या सामन्यात संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंग आणि शिवम दुबे यांची दमदार फटकेबाजी पाहायला मिळाली होती. गोलंदाजीतही जसप्रीतसह इतरांनीही छाप पाडली. पण, आजच्या सामन्यात जितेश शर्माला पदार्पणाची, तर आवेश खान व शाहबाज अहमद यांना संधी देण्याची इच्छा सर्वांनी व्यक्त केली होती. पण, पावसामुळे ना टॉस झाला ना सामना सुरू झाला आहे. दोन तास होत आले तरी रिमझिम पाऊस सुरूच आहे आणि मैदान अजूनही झाकलेलं आहे. बीसीसीआयने दिलेल्या अपडेट्स नुसार अजूनही तेथे पाऊस सुरू आहे, पण आता मॅच सुरू झाल्यास षटकं कमी केली जाणार नाहीत. पण, ९.१५ वाजल्यानंतर षटकं कमी होत जातील.


Web Title: IND vs IRE 3rd T20I Live Marathi : Update: The drizzle hasn't stopped yet. No overs lost so far but we we will start losing overs from 9:15 PM IST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.