Join us  

Hardik Pandya, IND vs IRE : धोनी-कोहलीला जे नाही जमले ते हार्दिक पांड्याने दोन सामन्यांत करून दाखवले, नोंदवला भारी विक्रम 

India vs Ireland T20I : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ट्वेंटी-20 मालिकेत आयर्लंडवर 2-0 असा विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 1:25 PM

Open in App

India vs Ireland T20I : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ट्वेंटी-20 मालिकेत आयर्लंडवर 2-0 असा विजय मिळवला. या निकालासह हार्दिक पांड्याने मोठ्या विक्रमाची नोंद केली. विराट कोहली व महेंद्रसिंग धोनी या भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांनाही हा पराक्रम करता आलेला नाही. दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात भारताच्या 225 धावांच्या प्रत्युत्तरात आयर्लंडने 221 धावा करताना अखेरपर्यंत कडवी झुंज दिली.  आयर्लंडला अखेरच्या षटकात विजयासाठी 17 धावांची गरज असताना हार्दिकने स्वतः गोलंदाजी न करता युवा गोलंदाज उम्रान मलिकवर ( Umran Malik) विश्वास दाखवला. त्यानेही तो विश्वास सार्थ ठरवताना भारताला 4 धावांनी विजय मिळवून दिला.  

प्रथम फलंदाजी करताना दीपक हुडा ( 104)  व संजू सॅमसन ( 77) यांच्या दमदार 176 धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारताने 7 बाद 225 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंग ( 40)  व अँडी बॅलबर्नी ( 60) यांनी स्फोटक कामगिरी करताना 9 षटकांत 100 धावा कुटल्या. त्यानंतर हेरी टेक्टर ( 39), जॉर्ज डॉकरेल ( 34*) व मार्क एडर ( 23*) यांनी खिंड लढवली. अखेरच्या षटकांत 17 धावांची गरज असताना उम्रानने 12 धावा दिल्या आणि भारताने 4 धावांनी हा सामना जिंकला.

ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून पहिले दोन सामने जिंकणारा हार्दिक पांड्या हा भारताचा तिसरा कर्णधार ठरला. यापूर्वी सुरेश रैनाने 2010 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध, तर रोहित शर्माने 2017मध्ये श्रीलंकेविरुद्ध ही कामगिरी केली आहे.  

टॅग्स :हार्दिक पांड्याआयर्लंडसुरेश रैनारोहित शर्मा
Open in App