Umran Malik, IND vs IRE : धोनी, कोहली, रोहित यांची परंपरा हार्दिक पांड्याने कायम राखली; उम्रान मलिकला भेट दिली, Video 

India vs Ireland T20I : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ट्वेंटी-20 मालिकेत आयर्लंडवर 2-0 असा विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 11:34 AM2022-06-29T11:34:50+5:302022-06-29T11:35:11+5:30

whatsapp join usJoin us
IND vs IRE : MS Dhoni to Virat Kohli to Rohit Sharma and now Hardik Pandya - he has handed over the winning trophy to Umran Malik, Video | Umran Malik, IND vs IRE : धोनी, कोहली, रोहित यांची परंपरा हार्दिक पांड्याने कायम राखली; उम्रान मलिकला भेट दिली, Video 

Umran Malik, IND vs IRE : धोनी, कोहली, रोहित यांची परंपरा हार्दिक पांड्याने कायम राखली; उम्रान मलिकला भेट दिली, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Ireland T20I : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ट्वेंटी-20 मालिकेत आयर्लंडवर 2-0 असा विजय मिळवला. दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात भारताच्या 225 धावांच्या प्रत्युत्तरात आयर्लंडने 221 धावा करताना अखेरपर्यंत कडवी झुंज दिली. आयर्लंडला अखेरच्या षटकात विजयासाठी 17 धावांची गरज असताना हार्दिकने स्वतः गोलंदाजी न करता युवा गोलंदाज उम्रान मलिकवर ( Umran Malik) विश्वास दाखवला. त्यानेही तो विश्वास सार्थ ठरवताना भारताला 4 धावांनी विजय मिळवून दिला. यानंतर कॅप्टन हार्दिकने जम्मू-काश्मीरच्या गोलंदाजाला भेट दिली. महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा यांची परंपरा हार्दिकने कायम राखली.


प्रथम फलंदाजी करताना दीपक हुडा ( 104)  व संजू सॅमसन ( 77) यांच्या दमदार 176 धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारताने 7 बाद 225 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंग ( 40)  व अँडी बॅलबर्नी ( 60) यांनी स्फोटक कामगिरी करताना 9 षटकांत 100 धावा कुटल्या. त्यानंतर हेरी टेक्टर ( 39), जॉर्ज डॉकरेल ( 34*) व मार्क एडर ( 23*) यांनी खिंड लढवली. 

अखेरच्या षटकाची चुरस
उम्रानने पहिले दोन चेंडू निर्धाव फेकली, परंतु दुसरा चेंडू नो बॉल ठरला अन् फ्री हिटवर चौकार खेचला गेला. ४ चेंडूंत १२ धावांची आयर्लंडला गरज होती. मार्क एडरने स्लिपच्या डोक्यावरून चौकार मिळवला... चौथ्या चेंडूवर १ धावा आली अन् २ चेंडूंत ७ धावा आवश्यक होत्या. पाचवा चेंडूवर एक धाव आली.. आयर्लंडने ५ बाद २२१ धावांपर्यंत मजल मारली. भारताने ४ धावांनी सामना जिंकला.  या विजयानंतर हार्दिकने जेतेपदाही ट्रॉफी उम्रान मलिकच्या हाती सोपवली.

Web Title: IND vs IRE : MS Dhoni to Virat Kohli to Rohit Sharma and now Hardik Pandya - he has handed over the winning trophy to Umran Malik, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.