India vs Ireland T20I : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ट्वेंटी-20 मालिकेत आयर्लंडवर 2-0 असा विजय मिळवला. दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात भारताच्या 225 धावांच्या प्रत्युत्तरात आयर्लंडने 221 धावा करताना अखेरपर्यंत कडवी झुंज दिली. आयर्लंडला अखेरच्या षटकात विजयासाठी 17 धावांची गरज असताना हार्दिकने स्वतः गोलंदाजी न करता युवा गोलंदाज उम्रान मलिकवर ( Umran Malik) विश्वास दाखवला. त्यानेही तो विश्वास सार्थ ठरवताना भारताला 4 धावांनी विजय मिळवून दिला. यानंतर कॅप्टन हार्दिकने जम्मू-काश्मीरच्या गोलंदाजाला भेट दिली. महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा यांची परंपरा हार्दिकने कायम राखली.
अखेरच्या षटकाची चुरसउम्रानने पहिले दोन चेंडू निर्धाव फेकली, परंतु दुसरा चेंडू नो बॉल ठरला अन् फ्री हिटवर चौकार खेचला गेला. ४ चेंडूंत १२ धावांची आयर्लंडला गरज होती. मार्क एडरने स्लिपच्या डोक्यावरून चौकार मिळवला... चौथ्या चेंडूवर १ धावा आली अन् २ चेंडूंत ७ धावा आवश्यक होत्या. पाचवा चेंडूवर एक धाव आली.. आयर्लंडने ५ बाद २२१ धावांपर्यंत मजल मारली. भारताने ४ धावांनी सामना जिंकला. या विजयानंतर हार्दिकने जेतेपदाही ट्रॉफी उम्रान मलिकच्या हाती सोपवली.