India vs Netherlands , T20 World Cup : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. पाकिस्ताननंतर टीम इंडियाने नेदरलँड्सवर सहज विजय मिळवला. रोहित शर्माला गवसलेला सूर ही या सामन्यातील सकारात्मक बाब ठरली. रोहितसह विराट कोहली व सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतकी खेळी केली. भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग व आर अश्विन यांनी गोलंदाजीत कमाल दाखवली. भारताच्या या विजयाने पाकिस्तानला धडकी भरली.
Jay Shah यांची मोठी घोषणा, महिला व पुरुष क्रिकेटपटूंना दिले जाणार समान वेतन; जाणून घ्या किती
लोकेश राहुल (९) पॉल व्हॅन मीकेरेनच्या गोलंदाजीवर LBW झाला. दोन जीवदान मिळालेल्या रोहितने ट्वेंटी- २० तील २९वे अर्धशतक पूर्ण केले. त्याने ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताकडून सर्वाधिक ३४ सिक्स मारण्याचा विक्रम नावावर केला. युवराज सिंगचा ३३ षटकारांचा विक्रम रोहितने मोडला. आयसीसी स्पर्धांमध्ये रोहितचे हे २३ वी ५०+ खेळी ठरली. विराट कोहली ( २४) व सचिन तेंडुलकर ( २३) हे आघाडीवर आहेत. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक ५०+ धावा करणाऱ्या फलंदाजांत रोहितने ( ९) ख्रिस गेलशी बरोबरी केली, या विक्रमात विराट ( ११) अव्वल स्थानावर आहे. रोहित ३९ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ५३ धावा करून बाद झाला. विराटसह त्याने ५६ चेंडूंत ७३ धावांची भागीदारी केली.
विराट व सूर्यकुमार यादव यांनी नेदरलँड्सच्या गोलंदाजांचा समाचार घेतला आणि ४८ चेंडूंत नाबाद ९५ धावांची भागीदारी केली. भारताने पहिल्या ६ षटकांत ५.३च्या सरासरीने धावा केल्या. त्यानंतर ७-१० षटकांत ६.१ आणि ११ -१५ षटकांत १०.२ च्या सरासरीने धावा चोपून वेग वाढवला. विराट ४४ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ६२ धावांवर नाबाद राहिला , तर सूर्यकुमारने २५ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारांसह ५१ धावा केल्या.. भारताने २ बाद १७९ धावा केल्या. भारताचा गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने पहिले षटक निर्धाव फेकले आणि त्याच्या दुसऱ्या षटकात नेदरलँड्सचा सलामीवीर विक्रमजीत सिंगचा ( १) त्रिफळा उडवला. भुवीने तेही षटक निर्धाव टाकले आणि सलग दोन षटकांत एकही धाव न देणारा तो भारताचा पहिला गोलंदाज ठरला. भुवी आणि जसप्रीत बुमराह यांनी ट्वेंटी-२० त सर्वाधिक ९ षटकं निर्धाव टाकली आहेत.
रोहितने गोलंदाजीत बदल करताना अक्षर पटेलला आणले आणि त्याने नेदरलँड्सच्या मॅक्स ओ'डाऊडचा ( १६) त्रिफळा उडवला. दिनेश कार्तिकने दोन स्टम्पिंगच्या संधी सोडल्या. पण, अक्षर पटेल व आर अश्विन यांनी नेदरलँड्सला डोकं वर काढू दिलं नाही. अक्षरने त्याच्या ४ षटकांत १८ धावा देत २ विकेट्स घेतल्या. अश्विनने १३व्या षटकात ऑरेंज आर्मीला दोन घक्के दिले आणि त्यांचा निम्मा संघ ६३ धावांत माघारी परतला. अश्विनने ४ षटकांत २१ धावांवर २ विकेट्स घेतल्या. भुवी व अर्शदीप सिंग व मोहम्मद शमी यांनी अखेरच्या षटकांत धक्कातंत्र कायम राखले आणि भारताचा विजय पक्का केला. १८व्या षटकात अर्शदीपने सलग दोन विकेट्स घेतल्या. २०व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याला हॅटट्रिकची संधी होती, परंतु त्याला यश नाही मिळाले. भारताच्या एकाही गोलंदाजाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये हॅटट्रिक घेता आलेली नाही. अर्शदीपने १४ धावा दिल्या. नेदरलँड्सने ९ बाद १२३ धावा केल्या आणि भारताने ५६ धावांनी सामना जिंकला.
ग्रुप २ च्या गुणतालिकेतील परिस्थिती....
भारताने हा सामना जिंकून ४ गुणांसह तालिकेत अव्वल स्थान पटकावले, तर दक्षिण आफ्रिकेने आज बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवून ३ गुणांसह दुसरे स्थान पटकावले. या दोन्ही संघांची ही वाटचाल पाकिस्तानचं टेंशन वाढवणारी आहे. पाकिस्तान आता झिम्बाब्वेविरुद्ध खेळणार आहे आणि तो सामना जिंकल्यानंतरही त्यांच्या खात्यात २ गुण जमा होतील. बांगलादेशच्या नावावरही दोन गुण आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IND vs NED, T20 World Cup : Back-to-back win for Team India, beat Netherlands by 56 runs, became a table toper in group 2
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.