India vs Netherlands , T20 World Cup : भारत आणि नेदरलँड्स यांच्यात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सामना सिडनी येथे होत आहे. या सामन्यावर पावसाच्या सावटाची शक्यता वर्तवण्यात येत असली तरी सध्यातरी निळे आकाश दिसतेय. भारताने वर्ल्ड कप स्पर्धेत दणक्यात सुरुवात करताना पाकिस्तानला धक्का दिला. विराट कोहली व हार्दिक पांड्या हे त्या विजयाचे शिल्पकार ठरले. पण, भारताला अपेक्षित नेट रन रेट कमावता आलेला नाही. आज ती उणीव भरून काढण्याची संधी भारतासमोर आहे. दक्षिण आफ्रिकेने १०४ धावांनी बांगलादेशला नमवून नेट रन रेट +५ वर नेला आणि भारताला यापेक्षा अधिक नेट रन रेट मिळवावा लागेल.
दक्षिण आफ्रिकेने १०४ धावांनी बांगलादेशवर विजय मिळवला, ग्रुप २ मध्ये अव्वल बनला
भारताने पहिल्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवला. ग्रुप २ मध्ये बांगलादेशनेही विजयाची नोंद करून सरस नेट रन रेटच्या जोरावर अव्वल स्थान पटकावले होते. आज त्यांना दक्षिण आफ्रिकेकडून हार मानावी लागली आणि आफ्रिका ३ गुणांसह अव्वल स्थानी पोहोचला. आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यातला सामना पावसामुळेच अनिर्णित राहिला आणि दोघांना एकेक गुण मिळाले होते. भारताच्या खात्याताच्या २ गुण आहेत, परंतु त्यांचा नेट रन रेट ०.०५० असा आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"