नवी दिल्ली - भारतीय खेळाडू मागील ६ महिन्यांपासून बायो बबलमध्ये आहेत. इंग्लंड दौरा, आयपीएल २०२१, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आता टीम इंडिया मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध मालिका खेळणार आहे. १७ नोव्हेंबरपासून तीन ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे आणि त्यानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेंतर्गत ( WTC) दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी अजिंक्य रहाणेकडे संघाचे नेतृत्व असणार आहे.
विराट कोहलीनं ( Virat Kohli) ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर ती जबाबदारी रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) खांद्यावर सोपवण्यात आली आहे. लोकेश राहुल ( KL Rahul) उपकर्णधार असणार, ही घोषणा बीसीसीआयनं नुकतीच केली. विराटनं विश्रांती घेतली आहे आणि रोहितनंही बीसीसीआयकडे सुट्टी मागितल्याने आता कर्णधार कोणाला करावं, हा प्रश्न बीसीसीआयला सतावत होता. आता, कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी मराठमोळ्या अजिंक्य रहाणेकडे जबाबदारी देण्यात आली आहे. तर, विराट कोहली दुसऱ्या सामन्यापासून संघात कर्णधार म्हणून दाखल असणार आहे.
ऑल इंडिया सिलेक्शन कमिटीने न्यूझीलंडसाठीच्या 16 सदस्यीत भारतीय संघाची घोषणा केली. त्यानुसार, रोहित शर्माला टी-20 सामन्यात आराम देण्यात आला आहे. तर, अजिंक्य रहाणेकडे पहिल्या कसोटी सामन्याचे नेतृत्व देण्यात आले आहे. चेतेश्वर पुजारा उपकर्णधार असणार आहे. दरम्यान, दुसऱ्या कसोटी मालिकेसाठी कर्णधार म्हणून विराट कोहली वापसी करणार आहे. या कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत यांना आराम देण्यात आला आहे.
India vs New Zealand Schedule 2021
पहिला ट्वेंटी-२०- १८ नोव्हेंबर, २०२१, जयपूरदूसरा ट्वेंटी-२० - १९ नोव्हेंबर, २०२१, रांचीतिसरा ट्वेंटी-२० - २१ नोव्हेंबर, २०२१, कोलकातापहिली कसोटी - २५ ते २९ नोव्हेंबर, कानपूरदुसरी कसोटी - ३ ते ७ डिसेंबर, मुंबई
भारतीय संघ - अजिंक्य रहाणे (कप्तान), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा (उप-कप्तान), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, ऋद्धिमान साहा, केएस भरत, रविंद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा। न्यूझीलंडचा कसोटी संघ - केन विलियम्सन, टॉम ब्लंडल, डेव्हान कॉनवे, कायले जेमिन्सन, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, अजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रविंद्र, मिचेल सँटनर, विल समरविल, टीम साऊदी, रॉस टेलर, विल यंग, निल वॅगनर
दरम्यान, विराटनं न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतूनही विश्रांती मागितली आहे आणि तो मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत खेळणार आहे. या मालिकेत बीसीसीआय बुमराह, शमी, शार्दूल व रिषभ पंत यांनाही विश्रांती देण्याचा विचार करत आहे. त्यामुळे पहिल्या कसोटीत टीम इंडियाचे नेतृत्व रोहित सांभाळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. पण, आता रोहितनंही कसोटी मालिकेतून विश्रांती मागितली आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली टीम इंडिया कसोटी मालिकेत किवींचा सामना करणार हे निश्चित झाले.