India vs New Zealand 1st ODI Live : भारताच्या ३०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरूवात निराशाजनक झाली. पण, अनुभवी कर्णधार केन विलियम्सन व टॉम लॅथम या जोडीने टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली. लॅथमने शार्दूल ठाकूरच्या एका षटकात २५ धावा चोपून शतक पूर्ण केले. ७० चेंडूंत ७७ धावा करणाऱ्या लॅथमने पुढील ७ चेंडूंत शतकी धावा फलकावर चढवल्या. किवींनी ४१ षटकांत ३ बाद २५० धावा केल्या.
शिखर धवन ( ७२) आणि शुबमन गिल ( ५०) या जोडीनं भारताला दमदार सुरुवात करून देताना १२४ धावांची भागीदारी केली. रिषभ पंत (१५) व सूर्यकुमार यादव ( ४) हेही अपयशी ठरले आणि भारताची धावगती मंदावली. श्रेयस अय्यर ( ८०) व संजू सॅमसन ( ३६) यांनी ७७ चेंडूंत ९४ धावांची महत्त्वाची भागीदारी केली. दुखापतीतून कमबॅक केलेल्या वॉशिंग्टन सुंदरने १६ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारासह नाबाद ३७ धावा केल्या. भारताने ७ बाद ३०६ धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने सावध खेळ केला. फिन अॅलन व डव्हॉन कॉनवे ही जोडी विकेट टिकवून खेळत होती. पण, शार्दूल ठाकूरने पहिला धक्का दिला. फिन ( २२) माघारी परतल्यानंतर पदार्पणवीर उम्रान मलिकने कमाल केली. त्याने किवींचा सलामीवीर कॉनवे ( २४) आणि डॅरील मिचेल ( ११) यांची विकेट घेतली.
३ बाद ८८ वरून न्यूझीलंडचा डाव कर्णधार केन विलियम्सन व टॉम लॅथम यांनी सावरला. या दोघांनी वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करताना भारतासमोर आव्हान उभे केले. ३६व्या षटकात ही जोडी तोडण्याची संधी भारतासाठी चालून आली होती, परंतु शिखर धवनने किवी कर्णधार केनचा सोपा झेल टाकला. उम्रान व अर्शदीप यांचा अनुभव कमी पडत होता आणि किवींची अनुभवी जोडी त्याचा फायदा उचलताना दिसली. विकेट हातच्या राखून या जोडीने धावांचा वेग वाढवण्यास सुरूवात केली. शतकी भागीदारी पूर्ण केल्यानंतर लॅथमने जोरदार फटकेबाजी केली. शार्दूलच्या एका षटकात त्याने ६, ४,४,४,४ अशा धावा चोपल्या. लॅथमने त्या षटकात २५ चेंडू चोपून शतक पूर्ण केले. लॅथमने ७६ चेंडूंत हे शतक झळकावले. भारताविरुद्धचे हे त्याचे दुसरे ( २०१७) शतक ठरले.
केन व लॅथम यांनी चौथ्या विकेटसाठी १५१* धावांची केलेली भागिदारी ही इडन पार्कवरील सर्वोत्तम ठरली. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या डॅरल कुलियन व जॅक्स कॅलिस यांनी १४५ धावांची भागीदारी केली होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IND vs NZ 1st ODI Live : 6 Wd 4 4 4 4 Wd 1 - 25 runs off Shardul Thakur's over, Tom Latham was 77*(70) then 6,4,4,4,4,1 and completed his second ODI hundred against India, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.