India vs New Zealand 1st ODI Live : भारताच्या ३०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरूवात निराशाजनक झाली. पण, अनुभवी कर्णधार केन विलियम्सन व टॉम लॅथम या जोडीने टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली. लॅथमने शार्दूल ठाकूरच्या एका षटकात २५ धावा चोपून शतक पूर्ण केले. ७० चेंडूंत ७७ धावा करणाऱ्या लॅथमने पुढील ७ चेंडूंत शतकी धावा फलकावर चढवल्या. किवींनी ४१ षटकांत ३ बाद २५० धावा केल्या.
शिखर धवनमुळे टीम इंडिया हातचा सामना गमावतेय? केन-लॅथम जोडी डोईजड ठरतेय!
शिखर धवन ( ७२) आणि शुबमन गिल ( ५०) या जोडीनं भारताला दमदार सुरुवात करून देताना १२४ धावांची भागीदारी केली. रिषभ पंत (१५) व सूर्यकुमार यादव ( ४) हेही अपयशी ठरले आणि भारताची धावगती मंदावली. श्रेयस अय्यर ( ८०) व संजू सॅमसन ( ३६) यांनी ७७ चेंडूंत ९४ धावांची महत्त्वाची भागीदारी केली. दुखापतीतून कमबॅक केलेल्या वॉशिंग्टन सुंदरने १६ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारासह नाबाद ३७ धावा केल्या. भारताने ७ बाद ३०६ धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने सावध खेळ केला. फिन अॅलन व डव्हॉन कॉनवे ही जोडी विकेट टिकवून खेळत होती. पण, शार्दूल ठाकूरने पहिला धक्का दिला. फिन ( २२) माघारी परतल्यानंतर पदार्पणवीर उम्रान मलिकने कमाल केली. त्याने किवींचा सलामीवीर कॉनवे ( २४) आणि डॅरील मिचेल ( ११) यांची विकेट घेतली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"