Join us  

IND vs NZ, 1st ODI Live : ६,६,६! शुभमन गिलने झळकावले द्विशतक; असा पराक्रम करणारा जगातील सर्वात युवा फलंदाज ठरला

India vs New Zealand, 1st ODI Live : शुभमन गिलने ( Shubman Gill) आज रेकॉर्ड ब्रेकिंग खेळी करताना टीम इंडियाला धावांचा डोंगर उभारून दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 5:16 PM

Open in App

India vs New Zealand, 1st ODI Live : शुभमन गिलने ( Shubman Gill) आज रेकॉर्ड ब्रेकिंग खेळी करताना टीम इंडियाला धावांचा डोंगर उभारून दिला. रोहित शर्मा, विराट कोहली व इशान किशन हे आघाडीचे फलंदाज माघारी परतल्यानंतर शुभमनने स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांची त्याने धुलाई करताना विक्रमी धावा चोपल्या.  शुभमनला सूर्यकुमार यादव व हार्दिक पांड्या याची तुल्यबळ साथ मिळाली. हार्दिकच्या विकेटने या सामन्यात वादाची ठिणगी पडली. पण, शुभमन अखेरपर्यंत खेळपट्टीवर उभा राहिला आणि न्यूझीलंडसमोर तगडे आव्हान उभे केले. गिलला सुरुवातीला जीवदान देणे किवींना महागात पडले. 

Video : अम्पायरने चिटींग केली! Not Out हार्दिक पांड्याला दिले Out, वादाला फुटले तोंड अन्... 

रोहित व शुभमन ही  जोडी सलामीला आली अन् आज रोहित चांगल्या फॉर्मात दिसला. पण, पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यापासून तो वंचित राहिला. रोहित ३८ चेंडूंत ३४ धावांवर (  ४ चौकार व २ षटकार) माघारी परतला. विराट कोहली ( ८) व इशान किशन ( ५) हे स्वस्तात माघारी परतले. सूर्यकुमार यादव मैदानावर येताच स्टेडियम त्याच्या जयघोषाने दणाणून निघाले. सूर्या व शुभमन यांनी भारताचा डाव सावरताना ५२ चेंडूंत ६५ धावांची भागीदारी केली. डॅरील मिचेलने सूर्या ३१ धावांवर सँटनरच्या हातात सोपा झेल देऊन माघारी पाठवले. शुभमन गिलने ८६ चेंडूंत शतक पूर्ण केले. 

गिलचे हे वन डे क्रिकेटमधील तिसरे शतक ठरले. वन डे क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात कमी इनिंग्जमध्ये १००० धावांचा विक्रम शुभमनने नावावर केला. शिप्लीने स्वतःच्याच गोलंदाजीवर १२४ धावांवर असणाऱ्या शुभमनचा रिटर्न झेल टाकला. हार्दिक पांड्या व शुभमन यांनी ६७ चेंडूंत ७४ धावांची भागीदारी केली. हार्दिकची विकेट अम्पायरने ढापली. हार्दिकला २८ धावांवर डॅरिल मिचेलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत दिले गेले. पण, बेल्स यष्टिरक्षक टॉम लॅथमच्या ग्लोव्हजला लागून पडल्याचे स्पष्ट दिसत होते. वॉशिंग्टन सुंदर ( १२) LBW झाला. शुभमनला स्ट्राईक देण्यासाठी शार्दूल ठाकूरने ( ३) स्वतःची विकेट टाकली. 

शुभमनने १७५+ धावा करताच सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. हैदराबादच्या या मैदानावरील वन डे क्रिकेटमधील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. सचिनने २००९मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७५ धावांचा विक्रम मोडला. शुभमनने अखेरपर्यंत दमदार फलंदाजी करताना द्विशतक पूर्ण केले. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, इशान किशन यांच्यानंतर वन डे त द्विशतक झळकावणारा तो पाचवा भारतीय फलंदाज ठरला. त्याने ४९व्या षटकात सलग तीन षटकार खेचून द्विशतक पूर्ण केले.

इशान किशनने २४ वर्ष व १४५ दिवसांचा असताना द्विशतक झळकावले होते, शुभमनने २३ वर्ष व १३२ वर्षांचा असताना हा पराक्रम करून द्विशतक झळकावणाऱ्या युवा फलंदाजाचा मान पटकावला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडशुभमन गिलसूर्यकुमार अशोक यादवहार्दिक पांड्या
Open in App