IND vs NZ, 1st ODI Live : अम्पायरने चिटींग केली! Not Out हार्दिक पांड्याला दिले Out, वादाला फुटले तोंड अन्... 

हार्दिक पांड्यानेही त्याला चांगली साथ दिली, परंतु तिसऱ्या अम्पायरच्या निर्णयाचा फटका भारताला बसला. हार्दिक नाबाद असतानाही त्याला अम्पायरने बाद दिले अन् मोठे वाद निर्माण झाला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 04:43 PM2023-01-18T16:43:11+5:302023-01-18T17:06:20+5:30

whatsapp join usJoin us
IND vs NZ, 1st ODI Live : Hardik Pandya is really unlucky, was a bad call from the third umpire, Video  | IND vs NZ, 1st ODI Live : अम्पायरने चिटींग केली! Not Out हार्दिक पांड्याला दिले Out, वादाला फुटले तोंड अन्... 

IND vs NZ, 1st ODI Live : अम्पायरने चिटींग केली! Not Out हार्दिक पांड्याला दिले Out, वादाला फुटले तोंड अन्... 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs New Zealand, 1st ODI Live : रोहित शर्मा, विराट कोहली व इशान किशन असे तीन फलंदाज माघारी परल्यानंतर शुभमन गिलने टीम इंडियाचा डाव सारवला.  सूर्यकुमार यादवच्या सोबतीने त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा सामना केला अन् वन डे तील  तिसरे शतक पूर्ण केले. शुभमनची वादळी खेळी अशीच सुरू राहिली अन् त्याने रेकॉर्डची नोंद केली. हार्दिक पांड्यानेही त्याला चांगली साथ दिली, परंतु तिसऱ्या अम्पायरच्या निर्णयाचा फटका भारताला बसला. हार्दिक नाबाद असतानाही त्याला अम्पायरने बाद दिले अन् मोठे वाद निर्माण झाला. 

 इतिहास घडला! शुभमन गिलने Viv Richards यांच्यासह विराट कोहलीचाही सर्वात मोठा रेकॉर्ड मोडला


रोहित व शुभमन ही  जोडी सलामीला आली अन् आज रोहित चांगल्या फॉर्मात दिसला. पण, पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यापासून तो वंचित राहिला. रोहित ३८ चेंडूंत ३४ धावांवर (  ४ चौकार व २ षटकार) माघारी परतला. विराट कोहली ( ८) व इशान किशन ( ५) हे स्वस्तात माघारी परतले. सूर्यकुमार यादव मैदानावर येताच स्टेडियम त्याच्या जयघोषाने दणाणून निघाले. सूर्या व शुभमन यांनी भारताचा डाव सावरताना ५२ चेंडूंत ६५ धावांची भागीदारी केली. डॅरील मिचेलने सूर्या ३१ धावांवर सँटनरच्या हातात सोपा झेल देऊन माघारी पाठवले. शुभमन गिलने ८६ चेंडूंत शतक पूर्ण केले. 

गिलचे हे वन डे क्रिकेटमधील तिसरे शतक ठरले. वन डे क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात कमी इनिंग्जमध्ये १००० धावांचा विक्रम शुभमनने नावावर केला. त्याने १९ इनिंग्जमध्ये हा पल्ला ओलांडताना विराट कोहली व शिखर धवन ( २४ इनिंग्ज) यांच्या नावावरील विक्रम मोडला. भारताकडून वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०००+ धावा करणारा तो फलंदाज ठरला.  जगात शुभमनने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. पाकिस्तानचा फाखर जमान १८ इनिंग्जसह अव्वल स्थानावर आहे.  

शिप्लीने स्वतःच्याच गोलंदाजीवर १२४ धावांवर असणाऱ्या शुभमनचा रिटर्न झेल टाकला. हार्दिक पांड्या व शुभमन यांनी ६७ चेंडूंत ७४ धावांची भागीदारी केली. हार्दिकची विकेट अम्पायरने ढापली. हार्दिकला २८ धावांवर डॅरिल मिचेलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत दिले गेले. पण, बेल्स यष्टिरक्षक टॉम लॅथमच्या ग्लोव्हजला लागून पडल्याचे स्पष्ट दिसत होते.  





सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: IND vs NZ, 1st ODI Live : Hardik Pandya is really unlucky, was a bad call from the third umpire, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.