Join us  

IND vs NZ, 1st ODI Live : शुभमन गिलचे खणखणीत शतक; मोडला लोकेश राहुलचा मोठा विक्रम, टीम इंडियालाही सावरले

India vs New Zealand, 1st ODI Live : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला वन डे सामना हैदराबाद येथे सुरू आहे आणि भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 3:44 PM

Open in App

India vs New Zealand, 1st ODI Live : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला वन डे सामना हैदराबाद येथे सुरू आहे आणि भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली व इशान किशन असे तीन फलंदाज माघारी पाठवण्यात किवींना यश आले आहे. शुभमन गिलने सातत्य राखताना अर्धशतक पूर्ण केले आणि सूर्यकुमार यादव त्याला साथ दिली. शुभमन गिलने ( Shubman Gill Century) शतक झळकावताना मोठा विक्रम केला. 

इथपर्यंत कसा पोहोचलो हे माझं मला माहित्येय, ते दिवस कधीच विसणार नाही; सूर्यकुमार यादव झाला इमोशनल

रोहित व शुभमन ही  जोडी सलामीला आली अन् आज रोहित चांगल्या फॉर्मात दिसला. त्याने व शुभमनने ६च्या सरासरीने धावांचा ओघ कायम ठेवला. रोहितने २० चेंडूंत २ चौकार व २ खणखणीत षटकार खेचले. शिप्लीला ऑफ साईडला मारलेला षटकार विक्रमी ठरला. वन डे क्रिकेटमध्ये  भारताकडून सर्वाधिक १२४ षटकारांचा विक्रम रोहितने नावावर करताना माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (  १२३) याला मागे टाकले. ब्लेअर टिकनरच्या चेंडूवर रोहितने उत्तुंग फटका मारला, पण तो डेरील मिचेलच्या हाती विसावला. रोहितला ३८ चेंडूंत ३४ धावांवर (  ४ चौकार व २ षटकार) माघारी परतावे लागले.

इन फॉर्म फलंदाज विराट कोहली मैदानावर येताच जोरदार जल्लोष सुरू झाला. विराटनेही चौकार खेचून चाहत्यांचा उत्साह वाढवला, परंतु मिचेल सँटनरने हैदराबादच्या स्टेडियमवर स्मशान शांतता पसरेल असा चेंडू टाकला. त्याने विराटचा ( ८) त्रिफळा उडवला अन् स्टेडियम शांत झाले. विराटनेही या चेंडूवर आश्चर्य व्यक्त केले. मायकेल ब्रेसवेलच्या एका चेंडूवर शुभमन गिलचा झेल अन् स्टम्पिंग करण्याची संधी यष्टिरक्षक टॉम लॅथमने सोडली. त्यानंतर शुभमनने षटकार खेचून अर्धशतक पूर्ण केले. द्विशतकवीर इशान किशनला आज संधी मिळाली खरी, परंतु लॉकी फर्ग्युसनने अप्रतिम चेंडू टाकून इशानला ( ५) बाद केले.  

सूर्यकुमार यादव मैदानावर येताच स्टेडियम त्याच्या जयघोषाने दणाणून निघाले. सूर्या व शुभमन यांनी भारताचा डाव सावरताना ४३ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. सूर्या व शुभमन यांची ५२ चेंडूंत ६५ धावांची भागीदारी डॅरील मिचेलने संपुष्टात आणली. सूर्या ३१ धावांवर सँटनरच्या हातात सोपा झेल देऊन माघारी परतला. शुभमन गिल थांबणारा नव्हता अन् त्याने शतक झळकावले. त्याने ८६ चेंडूंत शतक पूर्ण केले. गिलचे हे वन डे क्रिकेटमधील तिसरे शतक ठरले अन् त्याने १९ डावांमध्ये हा पराक्रम करताना भारताकडून सर्वात वेगाने तीन वन डे शतक झळकावण्याचा लोकेश राहुलचा ( २४) विक्रम मोडला. शिखर धवन १७ डावांमध्ये हा पराक्रम करून अव्वल स्थानी आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडशुभमन गिललोकेश राहुल
Open in App