IND vs NZ, 1st ODI Live : रोहित शर्माचा 'खतरा' शॉट! किवी गोलंदाजाने बोटं घातली तोंडात, हिटमॅनने मोडला MS Dhoniचा विक्रम 

India vs New Zealand, 1st ODI Live : श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ आयसीसी क्रमवारीत नंबर वन असलेल्या न्यूझीलंडचा सामना करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 02:03 PM2023-01-18T14:03:16+5:302023-01-18T14:07:21+5:30

whatsapp join usJoin us
IND vs NZ, 1st ODI Live : Rohit Sharma has the most sixes in India in ODI history , he (124*) overtakes MS Dhoni (123) for the most ODI sixes in India. | IND vs NZ, 1st ODI Live : रोहित शर्माचा 'खतरा' शॉट! किवी गोलंदाजाने बोटं घातली तोंडात, हिटमॅनने मोडला MS Dhoniचा विक्रम 

IND vs NZ, 1st ODI Live : रोहित शर्माचा 'खतरा' शॉट! किवी गोलंदाजाने बोटं घातली तोंडात, हिटमॅनने मोडला MS Dhoniचा विक्रम 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs New Zealand, 1st ODI Live : भारत-न्यूझीलंड यांच्यातला पहिला  वन डे सामना आज हैदराबाद येथे होत आहे.  ३ वर्ष, १० महिने व १६ दिवसांनी हैदराबाद येथे वन डे क्रिकेट होत असल्याने स्टेडियम हाऊस फुल पाहायला मिळत आहे. तिकीटांची ब्लॅकने विक्री सुरू आहे. श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ आयसीसी क्रमवारीत नंबर वन असलेल्या न्यूझीलंडचा सामना करणार आहे. या मालिकेत विजय मिळवून भारताला नंबर वन बनण्याची संधी आहे. रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी तशी दणक्यात सुरुवातही करून दिली. रोहितने हेन्री शिप्लीच्या गोलंदाजीवर असा खतरा षटकार खेचला की किवी गोलंदाजाने तोंडात बोटं घातली... या षटकारासह रोहितने वन डे क्रिकेटमधील मोठा विक्रम मोडला.

मालिकेआधीच श्रेयस अय्यरला पाठीच्या दुखण्यामुळे माघार घ्यावी लागली आहे. अशात सूर्यकुमार यादवचा प्लेइंग इलेव्हनचा मार्ग मोकळा झाला आहे. तरीही रोहित शर्मा आज कोणती प्लेइंग इलेव्हन उतरवतो याची उत्सुकता आहेच. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हार्दिक पांड्याचे सामन्यात पुनरागमन झाले, तर इशान किशन व सूर्यकुमार यादव यांना संधी मिळाली. रोहित व शुभमन ही  जोडी सलामीला आली अन् आज रोहित चांगल्या फॉर्मात दिसला. त्याने व शुभमनने ६च्या सरासरीने धावांचा ओघ कायम ठेवला. रोहितने २० चेंडूंत २ चौकार व २ खणखणीत षटकार खेचले. शिप्लीला ऑफ साईडला मारलेला षटकार विक्रमी ठरला.

वन डे क्रिकेटमध्ये भारतात सर्वाधिक १२४ षटकारांचा विक्रम रोहितने नावावर करताना माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (  १२३) याला मागे टाकले. सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये रोहितच्या नावावर  सर्वाधिक २४० षटकार आहेत. त्यानंतर धोनी १८६, विराट कोहली १३६ , युवराज सिंग ११३, वीरेंद्र सेहवाग १११ व सचिन तेंडुलकर १०७ असा क्रमांक येतो.  

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: IND vs NZ, 1st ODI Live : Rohit Sharma has the most sixes in India in ODI history , he (124*) overtakes MS Dhoni (123) for the most ODI sixes in India.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.