India vs New Zealand, 1st ODI Live : शुभमन गिलने ( Shubman Gill) आज रेकॉर्ड ब्रेकिंग खेळी केली. २३व्या वर्षी असा पराक्रम करताना द्विशतक झळकावणाऱ्या युवा फलंदाजाचा विक्रम त्याने नावावर केला. शुभमनने आज सचिन तेंडुलकर, विराट कोहली, व्हिव्हियन रिचर्ड आदी दिग्गजांचेही विक्रम मोडले. त्याने १४९ चेंडूंत १९ चौकार व ९ षटकारांसह २०८ धावांची खेळी केली. भारताकडून वन डे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा तो पाचवा फलंदाज ठरला. रोहित शर्माने तीन द्विशतकं झळकावली आहेत. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग व इशान किशन यांनीही द्विशतकी खेळी केली आहे. सारा तेंडुलकर आणि शुभमन यांच्या नात्याच्या चर्चा याआधीही रंगल्या होत्या आणि त्यात आज तर नेटिझन्सनी शुभमन व साराच्या लग्नाची तयारीच सुरू केली.
१९ चौकार, ९ षटकार! २३व्या वर्षी शुभमन गिल ठरला 'सुपर स्टार'; पाहा द्विशतकाचे हायलाईट्स, Video
रोहित ( ३८) व शुभमन ही जोडी सलामीला आली अन् पुन्हा एकदा रोहितला मोठी खेळी करता आली नाही. विराट कोहली ( ८) व इशान किशन ( ५) हे स्वस्तात माघारी परतले. सूर्यकुमार यादव ( ३१) व शुभमन यांनी भारताचा डाव सावरताना ५२ चेंडूंत ६५ धावांची भागीदारी केली. शुभमन गिलला दोन जीवदान मिळाले अन् न्यूझीलंडला ते महागात पडले. भारताने ८ बाद ३४९ धावांचा डोंगर उभा केला. इशान किशनने २४ वर्ष व १४५ दिवसांचा असताना द्विशतक झळकावले होते, शुभमनने २३ वर्ष व १३२ वर्षांचा असताना हा पराक्रम करून द्विशतक झळकावणाऱ्या युवा फलंदाजाचा मान पटकावला. शुभमनच्या या विक्रमी खेळी नंतर नेटिझन्स सुसाट सुटले.