India vs New Zealand, 1st ODI Live : शुभमन गिलच्या द्विशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या वन डे सामन्यात न्यूझीलंडसमोर विजयासाठी ३५० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रत्युत्तरात किवींचे ६ फलंदाज १३१ धावांवर माघारी परतले. या सामन्यात हार्दिक पांड्याची विकेट हा वादाचा मुद्दा ठरला होता. यष्टिरक्षक टॉम लॅथम याच्या ग्लोव्ह्जने बेल्स पडूनही हार्दिकला तिसऱ्या अम्पायरने त्रिफळाचीत बाद दिले होते. त्यामुळे बराच वाद सुरू आहे. टॉम लॅथम फलंदाजी करत असताना यष्टिरक्षक इशान किशनने बेल्स पाडल्या अन् अपील केले. त्याचे हे वागणे महान फलंदाज सुनील गावस्कर यांना अजिबात आवडले नाही आणि त्याने राग व्यक्त केला.
Video : अम्पायरने चिटींग केली! Not Out हार्दिक पांड्याला दिले Out, वादाला फुटले तोंड अन्...
कुलदीप यादवने टाकलेल्या १६व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर इशानने ही अपील केली. त्यानंतर अम्पायरने हिट विकेट आहे का हे पाहण्यासाठी रिप्लेचा इशारा केला. रिप्लेत बेल्स इशानने पाडल्याचे दिसले. रिप्ले सुरू असताना इशान हसत होता, परंतु समालोचन करणाऱ्या गावस्करांचा पारा चढला. हे क्रिकेट नाही, अशा कठोर शब्दात गावस्करांनी राग व्यक्त केला.
रोहित ( ३८) व शुभमन ही जोडी सलामीला आली अन् पुन्हा एकदा रोहितला मोठी खेळी करता आली नाही. विराट कोहली ( ८) व
इशान किशन ( ५) हे स्वस्तात माघारी परतले. सूर्यकुमार यादव ( ३१) व शुभमन यांनी भारताचा डाव सावरताना ५२ चेंडूंत ६५ धावांची भागीदारी केली. शुभमन गिलला दोन जीवदान मिळाले अन् न्यूझीलंडला ते महागात पडले. भारताने ८ बाद ३४९ धावांचा डोंगर उभा केला. इशान किशनने २४ वर्ष व १४५ दिवसांचा असताना द्विशतक झळकावले होते, शुभमनने २३ वर्ष व १३२ वर्षांचा असताना हा पराक्रम करून द्विशतक झळकावणाऱ्या युवा फलंदाजाचा मान पटकावला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IND vs NZ, 1st ODI Live : Sunil Gavaskar was unimpressed by Ishan Kishan after the youngster cheekily dislodged the bails, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.