Join us  

IND vs NZ, 1st ODI Live : विराट कोहलीला काही कळण्याआधीच त्रिफळा उडाला; गोलंदाजाने कसला भारी चेंडू टाकला, Video 

India vs New Zealand, 1st ODI Live : ३ वर्ष, १० महिने व १६ दिवसांनी हैदराबाद येथे वन डे क्रिकेट होत असल्याने स्टेडियम हाऊस फुल पाहायला मिळत आहे, परंतु भारताचे दोन स्टार फलंदाज माघारी परतले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 2:51 PM

Open in App

India vs New Zealand, 1st ODI Live : भारत-न्यूझीलंड यांच्यातला पहिला वन डे सामना आज हैदराबाद येथे होत आहे.  ३ वर्ष, १० महिने व १६ दिवसांनी हैदराबाद येथे वन डे क्रिकेट होत असल्याने स्टेडियम हाऊस फुल पाहायला मिळत आहे, परंतु भारताचे दोन स्टार फलंदाज माघारी परतले आहेत. रोहित शर्मा माघारी परतल्यानंतर इन फॉर्म विराट कोहलीकडून पुन्हा मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण, मिचेल सँटनरने टाकलेला चेंडू इतका भन्नाट होता की विराटचा त्रिफळा उडाला.  

 रोहित शर्माचा 'खतरा' शॉट! किवी गोलंदाजाने बोटं घातली तोंडात, हिटमॅनने मोडला MS Dhoniचा विक्रम 

मालिकेआधीच श्रेयस अय्यरला पाठीच्या दुखण्यामुळे माघार घ्यावी लागली आहे. अशात सूर्यकुमार यादवचा प्लेइंग इलेव्हनचा मार्ग मोकळा झाला.  भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हार्दिक पांड्याचे सामन्यात पुनरागमन झाले, तर इशान किशन व सूर्यकुमार यादव यांना संधी मिळाली. रोहित व शुभमन ही  जोडी सलामीला आली अन् आज रोहित चांगल्या फॉर्मात दिसला. त्याने व शुभमनने ६च्या सरासरीने धावांचा ओघ कायम ठेवला. रोहितने २० चेंडूंत २ चौकार व २ खणखणीत षटकार खेचले. शिप्लीला ऑफ साईडला मारलेला षटकार विक्रमी ठरला.

वन डे क्रिकेटमध्ये  भारताकडून सर्वाधिक १२४ षटकारांचा विक्रम रोहितने नावावर करताना माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (  १२३) याला मागे टाकले. सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये रोहितच्या नावावर सर्वाधिक २४० षटकार आहेत. त्यानंतर धोनी १८६, विराट कोहली १३६ , युवराज सिंग ११३, वीरेंद्र सेहवाग १११ व सचिन तेंडुलकर १०७ असा क्रमांक येतो. ब्लेअर टिकनरच्या चेंडूवर रोहितने उत्तुंग फटका मारला, पण तो डेरील मिचेलच्या हाती विसावला.

रोहितला ३८ चेंडूंत ३४ धावांवर (  ४ चौकार व २ षटकार) माघारी परतावे लागले. इन फॉर्म फलंदाज विराट कोहली मैदानावर येताच जोरदार जल्लोष सुरू झाला. विराटनेही चौकार खेचून चाहत्यांचा उत्साह वाढवला, परंतु मिचेल सँटनरने हैदराबादच्या स्टेडियमवर स्मशान शांतता पसरेल असा चेंडू टाकला. त्याने विराटचा ( ८) त्रिफळा उडवला अन् स्टेडियम शांत झाले. विराटनेही या चेंडूवर आश्चर्य व्यक्त केले. 

  

 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडविराट कोहलीरोहित शर्मा
Open in App