Join us  

IND vs NZ, 1st ODI : BIG NEWS : टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळे स्टार फलंदाजाची माघार, संघात करावा लागला बदल

India vs New Zealand 1st ODI Playing XI : भारतीय संघाने २०२३ ची सुरुवात श्रीलंकेविरुद्धच्या मालिका विजयाने केली.  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 2:22 PM

Open in App

India vs New Zealand 1st ODI Playing XI : भारतीय संघाने २०२३ ची सुरुवात श्रीलंकेविरुद्धच्या मालिका विजयाने केली.  विराट कोहलीचा परतलेला फॉर्म अन् शुभमन गिलची सातत्यपूर्ण कामगिरी ही भारतीय संघासाठी जमेची बाब आहे. पण, उद्यापासून सुरू होत असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारताला धक्का बसला आहे. मधल्या फळीतील प्रमुख फलंदाज श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) याला पाठीच्या दुखण्यामुळे वन डे मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादव याचे खेळणे आता निश्चित मानले जात आहे. श्रेयसच्या जागी संघात रजत पाटीदार याची निवड केली गेली आहे. 

इशान किशनला संधी, सूर्यकुमार यादव बाकावर बसेल? टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन अशी असेल

रोहित शर्मा व शुभमन गिल यांची जोडी चांगली जमलेली दिसतेय अन् अशात इशानला ओपनिंगला खेळवून ही लय अजिबात बिघडवण्याचा रोहित विचार करणार नाही. श्रेयसच्या माघारीमुळे सूर्यकुमार यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते.   लोकेशच्या अनुपस्थित इशान यष्टिंमागे दिसेल, परंतु त्याला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला यावे लागेल.  बांगलादेशविरुद्धच्या वन डे सामन्यात इशानने जलद द्विशतक झळकावण्याचा विक्रम केला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या  वन डे संघात भारताने केएस भरतचाही समावेश केला आहे आणि तो इशानसमोरील स्पर्धक आहे. पण, भरतला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी संघात प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता अधिक आहे. फिरकीपटूंमध्ये चहल व यादव यांच्यापैकी एकाला संधी मिळेल. चहलला दुखापत झाल्याने कुलदीपची एन्ट्री झाली होती आणि त्याने कमाल केली. त्यामुळे त्याला बाहेर काढणं हा त्याच्यावर अन्याय ठरू शकतो. 

भारताचा वन डे संघ ( वि. न्यूझीलंड) - रोहित शर्मा ( कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, विराट कोहली, रजत पाटीदार, सूर्यकुमार यादव, केएस भरत ( यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दूल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उम्रान मलिक. ( India’s updated ODI squad against New Zealand: Rohit Sharma (Captain), Shubman Gill, Ishan Kishan (wk), Virat Kohli, Suryakumar Yadav, KS Bharat (wk), Hardik Pandya (vice-captain), Rajat Patidar, Washington Sundar, Shahbaz Ahmed, Shardul Thakur, Yuzvendra Chahal, Kuldeep Yadav, Mohd. Shami, Mohd. Siraj, Umran Malik.) 

भारत-न्यूझीलंड पहिली वन डे - १८ जानेवारी, हैदराबाद दुसरी वन डे - २१ जानेवारी, रायपूरतिसरी वन डे - २४ जानेवारी, इंदूर

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडश्रेयस अय्यरसूर्यकुमार अशोक यादव
Open in App