ऑकलंड, भारत विरुद्ध न्यूझीलंड : पहिल्याच ट्वेन्टी-२० सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी तुफानी फटकेबाजी केली. या फटकेबाजीच्या जोरावर न्यूझीलंडला भारतापुढे २०४ धावांचे आव्हान ठेवता आले.
पहिल्या सामन्यात फलंदाजी करत असताना न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी दणक्यात सुरुवात केली. न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी यावेळी अर्धशतकी भागीदारी रचली. न्यूझीलंडला यावेळी मार्टीन गप्तीलच्या रुपात पहिला धक्का बसला. गप्तीलचचा अप्रतिम झेल यावेळी रोहितने घेतल्याचे पाहायला मिळाले.
रोहि सीमारेषेवर उभा होता. त्यावेळी त्याने झेल पकडण्याा प्रयत्न केला. यावेळी आपला पाय सीमारेषेला लागेल, असे रोहितला वाटले. त्यामुळे त्याने चेंडू हवेत उडवला आणि त्यानंतर झेल पकडला. यानंतर तिसऱ्या पंचांनी रोहितचा पाय सीमारेषेला लागला आहे की नाही, हे पाहिले आणि त्यानंतर गप्तील आऊट असल्याचा निर्णय दिला.
गप्तिल बाद झाला असला तरी न्यूझीलंडच्या फलंदाजांनी फटकेबाजी सुरुच ठेवली. कॉलिन मुनरोने यावेळी भारताच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५९ धावांची खेळी साकारली. मुनरोबरोबर कन विल्यमसननेही अर्धशतक पूर्ण केले, त्याने २४ चेंडूंत प्रत्येकी चार चौकार आणि षटकारांच्या जोरावर ५१ धावांची खेळी साकारली.