India vs New Zealand 1st T20I Live Update : भारतीय संघानं पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात न्यूझीलंडवर ५ विकेट्स व २ चेंडू राखून विजय मिळवला. भारतीय खेळाडूंनी सोपा विजय चुरशीचा बनवत प्रेक्षकांची उत्सुकता ताणली, परंतु रिषभ पंतनं चौकार खेचून टीम इंडियाला मालिकेत १-० अशी आघाडी मिळवून दिली. या सामन्यात रोहित शर्मा ( Rohit Sharma) व सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) यांनी दमदार खेळ केला. दीपक चहर ( Deepak Chahar) सर्वात महागडा गोलंदाज ठरला असला तरी त्याच्या एका कृतीला पुरस्कार मिळाला. दीपकनं न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टीन गुप्तील ( Martin Guptil) याला बाद केलं आणि त्यानंतर त्यानं दिलेली ठसन सोशल मीडियावर व्हायरल झाली. सामन्यातील ACC Kamaal ka moment हा पुरस्कार दीपकला मिळाला.
मार्क चॅपमॅन ( Mark Chapman) व मार्टीन गुप्तील ( Martin Guptill ) यांची शतकी भागीदारी केली. चॅपमॅन ५० चेंडूंत ६ चौकार व २ षटकारासह ६३ धावांवर त्रिफळाचीत झाला. अश्विननं त्याच्या वाट्याच्या चार षटकांत २३ धावा देत २ विकेट्स घेतल्या. गुप्तीलनं ४२ चेंडूंत ३ चौकार ४ षटकारासह ७० धावा केल्या. चहरनं ४ षटकांत सर्वाधिक ४२ धावा देत १ विकेट घेतली. न्यूझीलंडनं २० षटकांत ६ बाद १६४ धावा केल्या. सिराजनंही ४ षटकांत ३९ धावा देत १ विकेट घेतली.
चहरनं टाकलेल्या १८व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर गुप्तीलनं षटकार खेचला अन् पुढच्या चेंडूवर पुन्हा तसाच फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू श्रेयस अय्यरनं टीपला. त्यावेळी दीपकनं गुप्तीलला ठसन दिली.
पाहा व्हिडीओ..