Join us  

IND vs NZ 1st T20I Live : किवींनी फास आवळला, भारताचे १५ धावांत ३ फलंदाज पाठवले माघारी; Video

India vs New Zealand 1st T20I Live : अर्शदीप सिंगच्या अखेरच्या षटकात २७ धावा चोपल्यानंतर आत्मविश्वास कमावलेल्या न्यूझीलंडने गोलंदाजीतही कमाल करून दाखवली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 9:13 PM

Open in App

India vs New Zealand 1st T20I Live : अर्शदीप सिंगच्या अखेरच्या षटकात २७ धावा चोपल्यानंतर आत्मविश्वास कमावलेल्या न्यूझीलंडने गोलंदाजीतही कमाल करून दाखवली. १७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारताची त्यांनी १५ धावांत ३ विकेट अशी अवस्था केली. 

डॅरील मिचेल आणि डेव्हॉन कॉनवे या जोडीने भारताच्या गोलंदाजांची धुलाई केली, परंतु वॉशिंग्टन सुंदरच्या  ( Washington Sundar ) एका षटकाने मॅच फिरवली. कॉनवे अर्धशतक झळकावून माघारी परतला. न्यूझीलंडने पहिल्या ट्वेंटी-२०त भारतासमोर आव्हानात्मक धावसंख्या उभी करण्यात यश मिळवले. डॅरील मिचेलने अखेरच्या षटकांत चांगले फटके मारले अन् अर्धशतक पूर्ण केले. अर्शदीप सिंगच्या अखेरच्या षटकात त्याने २७ धावा चोपल्या. फिन ॲलन ( ३५) आणि कॉनवे यांनी आक्रमक सुरुवात केली होती. वॉशिंग्टन सुंदरने त्याच्या एकाच षटकात दोन धक्के देत भारताला कमबॅक करून दिले.  

कॉनवे व ग्लेन फिलिप्स यांची ६० धावांची भागीदारी कुलदीप यादवने तोडली. डॅरील मिचेल व कॉनवे यांनी दमदार खेळ केला. कॉनवे ५२ धावांवर बाद झाला. सुंदरने ४-०-२२-२  आणि कुलदीपने ४-०-२०-१ अशी कामगिरी केली. अर्शदीपच्या २०व्या षटकात मिचेलेने २७ धावा चोपून न्यूझीलंडला ६ बाद १७६ धावा उभ्या करून दिल्या. मिचेल ५९ धावांवर नाबाद राहिला.  लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरूवात अपेक्षित नाही झाली. मायकेल ब्रेसवेलने दुसऱ्या षटकात इशान किशनला ( ४) त्रिफळाचीत केले, तर जेकब डफीने तिसऱ्या षटकात राहुल त्रिपाठीला ( ०) माघारी पाठवून भारताची अवस्था २ बाद ११ अशी केली. मिचेल सँटनरने पुढील षटकात भारताला तिसरा धक्का दिला, शुभमन गिल ७ धावांवर बाद झाला. 

  

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडइशान किशनशुभमन गिल
Open in App