India vs New Zealand 1st T20I Live : फिन ॲलन आणि डेव्हॉन कॉनवे या जोडीने भारताच्या जलदगती गोलंदाजांची सुरुवातीच्या षटकातच हवा काढली. त्यामुळे कर्णधार हार्दिक पांड्याने डाव टाकला अन् तिसऱ्याच षटकात फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरला ( Washington Sundar ) गोलंदाजीला आणले. सुंदरने पहिले दोन चेंडू असे अप्रतिम वळवले की किवी फलंदाजांना त्यावर तोगडा सापडत नव्हता. त्यात सुंदरने त्याच्या दुसऱ्या षटकात कमाल करून दाखवली. त्याने ५ चेंडूंत २ विकेट्स घेतल्या आणि त्यात एक अफलातून झेलही होती.
पृथ्वी शॉ संघात परतला, पण प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरच राहिला; Video पोस्ट करून व्यक्त केल्या भावना
फिन ॲलन आणि डेव्हॉन कॉनवे ही जोडी सलामीला आली अन् हार्दिकच्या पहिल्याच षटकात फिनने दोन खणखणीत चौकार खेचून इरादा स्पष्ट केला. पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर फिनने उत्तुंग फटका मारला आणि सूर्यकुमार यादवने झेल घेत त्याला माघारी जाण्यास भाग पाडले. फिन २३ चेंडूंत ४ चौकार व २ षटकार खेचून ३५ धावांवर बाद झाला. त्यानंतर किवींनी डावखुरा फलंदाज मार्क चॅम्पमनला पाठवले. सुंदरने टाकलेला पहिला चेंडू यष्टींच्या अगदी जवळून गेल्याने चॅम्पमन थोडा गांगरला. त्यानंतर सहाव्या चेंडूवर सरळ फटका खेळला, परंतु सुंदरने हवात झेपावत अफलातून झेल घेतला. किवींचे दोन फलंदाज ४३ धावांवर माघारी परतले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"