India vs New Zealand, 1st Test : रोहित शर्मानं फुल टाइम कर्णधार म्हणून पहिल्याच ट्वेंटी-२० मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवलं. आता अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) नेतृत्वाची कसोटी आहे. २५ नोव्हेंबरपासून कानपूर येथे पहिल्या कसोटीला सुरुवात होणार आहे आणि विराट कोहली विश्रांतीवर असल्यानं अजिंक्यकडे नेतृत्वाची जबाबदारी आहे. पण, पहिल्याच कसोटीपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. अजिंक्य व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) कानपूर कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हन निश्चित करत असताना प्रमुख खेळाडूनं दुखापतीमुळे माघार घेतली आहे. भारतीय संघासाठी हा खूप मोठा धक्का आहे. PTIनं हे महत्त्वाचे वृत्त दिले आहे.
रोहित शर्मानं कसोटी मालिकेतून विश्रांती घेतल्यामुळे लोकेश राहुल, मयांक अग्रवाल व शुबमन गिल हे सलामीसाठी तीन पर्याय भारतासमोर होते. त्यात लोकेशचे संघातील स्थान हे पक्के होते. दुसऱ्या जागेसाठी मयांक व शुबमन यांच्यात निर्णय घ्यायचा होता. पण, फॉर्मात असलेल्या लोकेशनेच दुखापतीमुळे माघार घेतली आणि भारतीय संघाला मोठा धक्का बसला. कानपूर कसोटीच्या सराव सत्रात लोकेश सहभागी झाला नाही आणि त्यामुळे चर्चा रंगली होती. अखेर PTIनं बीसीसीआयच्या सूत्रांचा हवाला देताना लोकेशनं दुखापतीमुळे माघार घेतल्याचे वृत्त प्रसिद्ध केले.
भारताची अशी असेल प्लेइंग इलेव्हन - मयांक अग्रवाल, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, वृद्धीमान सहा, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज/उमेश यादव, इशांत शर्मा, प्रसिद्ध कृष्णा/अक्षर पटेल
पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ - अजिंक्य रहाणे ( कर्णधार), चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धीमान सहा, केएस भरत, रविंद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा