Join us  

IND vs NZ, 1st Test Live Updates : अजिंक्य रहाणेला जीवदान मिळूनही अपयश आलं, विराटच्या सहकाऱ्यानं टीम इंडियाला अडचणीत आणलं, Video 

India vs New Zealand, 1st Test Live Updates : कानपूर कसोटीत कर्णधार अजिंक्य रहाणे यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 2:44 PM

Open in App

India vs New Zealand, 1st Test Live Updates : कानपूर कसोटीत कर्णधार अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांना विकेट मिळवण्यासाठी  संघर्ष करावा लागतोय. पण, भारतीय फलंदाजांकडून झालेल्या चुकांचा त्यांना फायदा झालेला दिसतोय. या सामन्यात अजिंक्य आणि चेतेश्वर पुजारा यांच्या कामगिरीकडे  साऱ्यांच्या नजरा होत्या आणि या अनुभवी जोडीला फार प्रभाव पाडता आलेला नाही.  अजिंक्यला जीवदान मिळालं त्याच्या पुढच्याच चेंडूवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. आयपीएलमधील विराट कोहलीच्या RCB संघातील गोलंदाज कायले जेमिन्सननं टीम इंडियाला बॅकफूटवर टाकले आहे.

लोकेश राहुलच्या गैरहजेरीत मयांक अग्रवाल व शुबमन गिल ही जोडी सलामीला आली. पण, ८व्या षटकात जेमिन्सननं टीम इंडियाला पहिला धक्का देताना मयांकला ( १३)  झेलबाद केले. शुबमन व चेतेश्वर पुजारा यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी १३३ चेंडूंत ६१ धावा जोडल्या. शुबमननं अर्धशतक झळकावले, परंतु लंच ब्रेकनंतर तो बाद झाला.  जेमिन्सननंच ही विकेट घेतली आणि शुबमनला ५२ धावांवर माघारी फिरावे लागले. पुजारा व अजिंक्य रहाणे ही अनुभवी जोडी कमाल करेल असे वाटत होते, परंतु टीम साऊदीनं मोठा धक्का दिला. पुजारा २६ धावांवर बाद झाला. अजिंक्य खांद्यावर जबाबदारी घेऊन मोठी खेळी करेल, असे वाटत असतानाच त्यानं विकेट फेकली. 

जेमिन्सननं टाकलेल्या ५०व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर  अजिंक्यसाठी अपील झाली, मैदानावरील पंचांनी त्याला बाद दिले. परंतु DRSनंतर तो नाबाद असल्याचे दिसले. पण, हा जीवदान मिळूनही काही उपयोग झाला नाही. अजिंक्य पुढच्याच चेंडूवर त्रिफळाचीत झाला. त्याला ३५ धावा करता आल्या. भारताचे चार फलंदाज १४५ धावांवर माघारी परतले. 

पाहा व्हिडीओ.. 

  

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडअजिंक्य रहाणे
Open in App