Join us  

IND vs NZ, 1st Test Live Updates : पाचव्या दिवशी भारतीय संघाला बसले दोन धक्के; प्रमुख गोलंदाजाला क्षेत्ररक्षण करताना दुखापत

India vs New Zealand, 1st Test Live Updates : विजयाच्या निर्धारानं मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाला पहिल्या कसोटीच्या पाचव्या दिवशी दोन धक्के बसले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 10:06 AM

Open in App

India vs New Zealand, 1st Test Live Updates : विजयाच्या निर्धारानं मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाला पहिल्या कसोटीच्या पाचव्या दिवशी दोन धक्के बसले. टीम इंडियानं ठेवलेल्या २८४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडनं चौथ्या दिवशी १ विकेट गमावली होती. पण, पाचव्या दिवशी टॉम लॅथम व विलियम सोमरविल यांनी संयमी खेळ सुरू ठेवला आहे. दरम्यान, चौथ्या दिवशी वेदना होऊनही अर्धशतकी खेळी करणारा यष्टिरक्षक वृद्धीमान सहा मैदानावर उतरला नाही.  त्याच्याजागी  केएस भारत हा यष्टिंमागे दिसत आहे. त्यात संघाचा प्रमुख गोलंदाजाला क्षेत्ररक्षण करताना करंगळीला दुखापत झाली आणि त्याला मैदान सोडावे लागले.

भारतीय खेळाडूंनी चौथा दिवस गाजवला.  ५ बाद ५१ धावांवरून टीम इंडियानं ७ बाद २३४ धावांवर डाव घोषित केला. पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या श्रेयस अय्यरनं दुसऱ्या डावातही अर्धशतकी खेळी केली. त्यानं अश्विनच्या  व वृद्धीमान सहाच्या साथीनं  टीम इंडियाचा डाव सावरला. दुखापतीशी झगडणाऱ्या सहानंही संयमी खेळ करताना अर्धशतक पूर्ण केलं.  श्रेयसनं १२५ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ६५ धावा केल्या. सहा व अक्षर पटेल यांनी किवी गोलंदाजांना झुंजवले. या दोघांनी ८व्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. या जोडीनं ७ बाद १६७ धावांवरून टीम इंडियाला ७ बाद २३४ धावांपर्यंत मजल  मारून दिली. भारतानं किवींसमोर २८४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. सहा ६१  व अक्षर २८ धावांवर नाबाद राहिले.  

न्यूझीलंडची दुसऱ्या डावाची सुरूवात काही खास झाली नाही. पहिल्या डावातील अर्धशतकवीर विल यंग ( २) पायचीत झाला. त्यानं DRS घेतला असता तर आर अश्विनला ही विकेट मिळाली नसती. विल यंग व टॉम लॅथम यांनी चर्चा करण्यात एवढा वेळ घेतला की १५ सेंकदाचा अवधी निघून गेल्यानंतर  यंगनं DRS साठी अपील केली. पण भारतीय खेळाडूंनी त्याला विरोध केला. पाचव्या दिवशी यष्टिंमागे केएस भारत किपिंग करताना दिसला. तर इशांत शर्माला करंगळीच्या दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले.     

 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडवृद्धिमान साहाइशांत शर्मा
Open in App