Join us  

IND vs NZ, 1st Test Live Updates : विराट कोहलीच्या भीडूनं एकाच चेंडूवर कॅच अन् स्टम्पिंग करण्याची संधी सोडली; अक्षर पटेलनं भरपाई केली 

India vs New Zealand, 1st Test Live Updates : भारत-न्यूझीलंड पहिल्या कसोटी सामन्यात पाहुण्यांनी वर्चस्व मिळवलेलं पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 1:05 PM

Open in App

India vs New Zealand, 1st Test Live Updates : भारत-न्यूझीलंड पहिल्या कसोटी सामन्यात पाहुण्यांनी वर्चस्व मिळवलेलं पाहायला मिळत आहे. टॉम लॅथम व विल यंग या जोडीनं १५१ धावांची भागीदारी करून न्यूझीलंडसाठी भक्कम पाया रचला. पण, केन विलियम्सन ( ११) याला माघारी पाठवून उमेश  यादवनं मोठं यश मिळवलं. वृद्धीमान सहाच्या जागी आलेल्या RCBचा यष्टिरक्षक केएस भारतनं यंगचा सुरेख झेल टिपला, पण त्यानं रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर एकाच चेंडूवर रॉस टेलरचा  झेलही सोडला व यष्टिचीत करण्याची संधीही. नशीबानं अक्षर पटेलनं दोन षटकांत दोन विकेट घेत त्याच्या चूकीची भरपाई केली.  किवींचे ४ फलंदाज २२२ धावांवर माघारी परतलेत... 

रवींद्र जडेजा (५०), शुबमन गिल (  ५२) आणि  श्रेयस अय्यर ( १०५) यांच्या दमदार खेळीनंतरही भारताला ३४५ धावांवर समाधान मानावे लागले. टीम साऊदीनं ६९ धावा देताना ५ बळी टिपले. कायले जेमिन्सननं तीन व अजाझ पटेलनं दोन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचे सलामीवीर टॉम लॅथम व विल यंग यांनी पहिल्या विकेटसाठी १५१ धावांची भागीदारी केली. आर अश्विननं टीम इंडियाला तिसऱ्या दिवशी पहिले यश मिळवून दिले. केएस भारतनं सुरेख कॅच टिपला अन् विल यंगला माघारी जावं लागलं. यंगनं २१४ चेंडूंत १५ चौकारांच्या मदतीनं ८९ धावा केल्या. तिसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकपूर्वीच्या अखेरच्या षटकात उमेश यादवनं किवी कर्णधार केन विलियम्सनला ( १८) पायचीत केले.

लॅथम एका बाजूनं खिंड लढवत होता आणि अनुभवी फलंदाज रॉस टेलर त्याच्या साथीला होता. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर पुढे मारण्याच्या प्रयत्नात टेलरनं जवळपास त्याची विकेट दिलीच होती, परंतु केएस भारतनं स्टम्पिंगची संधी गमावली.  त्यानंतर रिप्लेत चेंडू बॅटला घासून गेल्याचे दिसले आणि भारतनं एकाच चेंडू कॅचही सोडला व स्टम्पिंगही... अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर भारतनं टेलरचा सुरेख झेल टिपला, त्यापाठोपाठ हेन्री निकोल्सलाही ( २) पायचीत करून अक्षरने  किवींना दोन धक्के दिले.  

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडरॉस टेलरअक्षर पटेल
Open in App