India vs New Zealand, 1st Test Live Updates : अजिंक्य रहाणे ( Ajikya Rahane) आणि राहुल द्रविड ( Rahul Dravid) जोडी नव्या आव्हानाचा सामना करण्यासाठी आज मैदानावर उतरली. न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर टीम इंडिया जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील ( WTC) दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडला आव्हान देण्यासाठी सज्ज झाली आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, रिषभ पंत, मोहम्मद शमी आदी काही प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत टीम इंडिया किवींचा सामना करणार आहे. याआधीही अजिंक्यच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरी धुळ चारण्याचा पराक्रम केला आहे आणि याही मालिकेत त्याच्या पुनरावृत्तीची अपेक्षा आहे.
India last lost a home Test against New Zealand was 1988 at Mumbai - १९८८नंतर न्यूझीलंडला भारतात एकही कसोटी विजय मिळवता आलेला नाही आणि हा इतिहास बदलण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. लोकेश राहुलनं दुखापतीमुळे कसोटीच्या ४८ तास आधी माघार घेतल्यानं टीम इंडियाची डोकेदुखी नक्की वाढली असेल. पण, त्यांच्याकडे पर्याय म्हणून युवा खेळाडू आहेत. मधल्या फळीत सूर्यकुमार यादव की श्रेयस अय्यर हा गुंता कर्णधार अजिंक्यनं कालच सोडवला अन् आजच्या सामन्यात श्रेयस पदार्पण करणार असल्याचे जाहीर केले होते. श्रेयसला महान फलंदाज सुनील गावस्कर यांच्या हस्ते पदार्पणाची कॅप दिली गेली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अय्यरनं ५०च्या सरासरीनं आणि ८०+च्या स्ट्राईक रेटनं धावा केल्या आहेत.
भारतीय संघ - शुबमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, वृद्धीमान सहा, रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, उमेश यादव, इशांत शर्मा
न्यूझीलंड संघ - टॉम लॅथम, विल यंग, केन विलियम्सन, रॉस टेलर, हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडल, रचिन रविंद्र, टीम साऊदी, अजाझ पटले, कायले जेमिन्सन, विलियम सोमरविल