India vs New Zealand, 1st Test Live Updates : टीम इंडियाच्या पहिल्या डावातील ३४५ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचे सलामीवीर टॉम लॅथम व विल यंग यांनी दमदार खेळ केला आहे. गोलंदाज विकेट मिळवण्यासाठी प्रयत्नशील असताना टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला. संघाचा यष्टिरक्षक वृद्धीमान सहा ( Wriddhiman Saha) याच्याजागी केएस भारत ( KS Bharat) यष्टींमागे क्षेत्ररक्षण करताना दिसला. सहा आज मैदानावर का उतरला नाही, याचे उत्तर बीसीसीआयनं दिलं.
''वृद्धीमान सहाची मान दुखत आहे. बीसीसीआयची वैद्यकिय टीम त्याच्यावर उपचार करत आहे. त्याच्या अनुपस्थितीत KS Bharat हा यष्टीरक्षण करणार आहे,''असे बीसीसीआयनं ट्विट केलं.
४ बाद २५८ धावांवरून दुसऱ्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या टीम इंडियाला टीम साऊदीनं धक्के दिले. रवींद्र जडेजा (५०), शुबमन गिल ( ५२) आणि श्रेयस अय्यर ( १०५) यांच्या दमदार खेळीनंतरही भारताला ३४५ धावांवर समाधान मानावे लागले. भारताचे सहा फलंदाज ८७ धावांत माघारी परतले. टीम साऊदीनं ६९ धावा देताना ५ बळी टिपले. कायले जेमिन्सननं तीन व अजाझ पटेलनं दोन विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात न्यूझीलंडचे सलामीवीर टॉम लॅथम व विल यंग यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना भारताला सडेतोड उत्तर दिले आहे. विल यंगनं भारतातील पहिले व कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल या फिरकीपटूंसह उमेश यादव व इशांत शर्मा हे जलदगती गोलंदाजही किवी सलामीवीरांसमोर हतबल झाले. टॉम लॅथमनंही कसोटीतील २१वे अर्धशतक १५७ चेंडूंत पूर्ण केले. दुसऱ्या दिवस अखेर न्यूझीलंडनं एकही विकेट न गमावता १२९ धावा केल्या होत्या.
Web Title: IND vs NZ, 1st Test Live Updates : Why Wriddhiman Saha was substituted by KS Bharat on Day 3 of Kanpur Test?, BCCI give Updates
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.