India vs New Zealand, 1st Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. १६ ऑक्टोबरपासून बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर या मालिकेतील पहिला सामना रंगणार आहे. पण बंगळुरुमध्ये पावसाची बॅटिंग सुरु असल्यामुळे पहिला सामना नियोजित वेळेत सुरु झालेला नाही.
पावसाची बॅटिंग थांबली तर मैदान खेळण्यायोग्य असेल का?
भारत-न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील सलामीच्या लढतीच्या आदल्या दिवशी बंगळुरुमध्ये जोरदार पाऊस झाला. हवामान अंदाजानुसार पाच दिवसांच्या खेळात ढगाळ वातावरण आणि पावसाचा खेळ कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसामुळे मैदानावर दिसणारे कव्हर पाहिल्यावर क्रिकेट लव्हर्सच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे पावसाची बॅटिंग थांबल्यावर मैदान खेळण्यायोग्य असेल का? पाऊस थांबल्यावर आउट फिल्डवरील साचलेल्या पाण्यामुळं किंवा ओलसरपणामुळं काही व्यत्यय निर्माण होईल का? मैदान खेळण्यायोग्य करण्यासाठी ग्राउंड्समन आणि त्यांच्या स्टाफला किती वेळ लागेल? जाणून घेऊयात त्यासंदर्भातील खास माहिती
अवघ्या १५ मिनिटांत मैदान खेळण्यायोग्य करणं अगदी सहज आहे सोपे
बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवरील ड्रेनेज सिस्टिम अर्थात मैदानातील पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था ही देशातील इतर स्टेडियममधील व्यवस्थेच्या तुलनेत सर्वोत्तम मानली जाते. २०१७ पासून इथं सब-सर्फेस एरेशन आणि व्हॅक्यूम-पॉवर ड्रेनेज सिस्टीमचा (sub-surface aeration and vacuum-powered drainage system) चा वापर केला जातो. या यंत्रणेत जवळपास १० हजार लिटर प्रति मिनिट वेगाने पाणी काढण्याची क्षमता आहे. त्यामुळे कितीही मोठा पाऊस पडला तरी SubAir system मुळं अवघ्या १५ मिनिटांत मैदान पुन्हा खेळण्यायोग्य करणं सहज शक्य होते.
कोट्यवधीचा खर्च करून उभारण्यात आलीये 'जादुई' यंत्रणा
केएससीएचे उपाध्यक्ष बी.के. संपत कुमार बंगळुरुच्या स्टेडियममधील यंत्रणेबद्दल म्हणाले होते की, "वनडे वर्ल्ड कपआधी आयसीसी शिष्टमंडळाने या स्टेडियमला भेट दिली होती. सबएयर सिस्टममुळे ते चांगलेच प्रभावित झाले. कारण या सिस्टीमच्या माध्यमातून एखादा मोठा खड्डाही काही संकेदात गायब होतो. ते अगदी जादुईरित्या काम करते." या यंत्रणेसाठी जवळपास ४.५ किमी लांबीच्या पाईप्स वापण्यात आल्या आहेत. ही व्यवस्था सेट करण्यासाठी सुमारे ४.२५ कोटी इतका खर्च करण्यात आला आहे.
Web Title: IND vs NZ 1st Test Toss delayed due to rain All you need to know about Bengaluru Stadium SubAir drainage system as rain threat looms over
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.