India vs New Zealand 1st Test : स्थानिक स्पर्धा गाजवणाऱ्या पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याचा न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठीच्या भारतीय संघात समावेश केला गेला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ट्वेंटी-२० मालिकेतील पहिला सामना २७ जानेवारी रोजी JSCA आंतरराष्ट्रीय स्टेडियम रांची येथे खेळवला जाईल. या मालिकेत भारताचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे सोपवले आहे, तर मिचेल सँटनर न्यूझीलंडचे नेतृत्व करताना दिसणार आहे. ऋतुराज गायकवाडला दुखापतीमुळे या मालिकेतून माघार घ्यावी लागल्याने पृथ्वीला ओपनिंगला संधी मिळेल अशी शक्यता होती, पण कर्णधार हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya) त्यावर पाणी फिरवले.
दोन वर्षांपासून पृथ्वी शॉ भारतीय संघातून बाहेर आहे. २५ जुलै २०२१ मध्ये त्याने श्रीलंकेविरुद्ध पहिला व अखेरचा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामना खेळला होता. त्यानंतर त्याने रणजी करंडक, मुश्ताक अली, विजय हजारे चषक या स्थानिक स्पर्धा गाजवल्या. २०२३ मध्ये भारतीय संघात निवड होण्यापूर्वी त्याने शतकांचा पाऊस पाडला होता, बीसीसीआय सचिव जय शाह यांनीही त्याचे कौतुक केले होते. त्यानंतर किवींविरुद्ध ट्वेंटी-२० संघात त्याची निवड झाली, परंतु प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला संधी मिळणे अवघड आहे. हार्दिक म्हणाला, उद्याच्या सामन्यात शुभमन गिल व इशान किशन हे सलामीला येतील.
हार्दिकच्या या विधानामुळे पृथ्वीला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान नसेल, हे स्पष्ट होत नाही. पृथ्वीला मधल्या फळीत सूर्यकुमार यादव आहेच,, दीपक हुडा व पृथ्वी यांच्यात चौथ्या क्रमांकासाठी स्पर्धा असू शकते.
भारताचा ट्वेंटी-२० संघ ( वि. न्यूझीलंड) - हार्दिक पांड्या ( कर्णधार), सूर्यकुमार यादव, इशान किशन, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा ( यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उम्रान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार
न्यूझीलंडचा ट्वेंटी-२० संघ: मिचेल सँटनर (कर्णधार), फिन ऍलन, डेव्हन कॉनवे, जेकब डफी, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेन क्लीव्हर, लॉकी फर्ग्युसन, बेन लिस्टर, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मायकेल रिपन, ब्लेअर टिकनर, हेन्री शिपले, ईश सोढी
पहिली ट्वेंटी-२० - २७ जानेवारी, रांचीदुसरी ट्वेंटी-२० - २९ जानेवारी, लखनौतिसरी ट्वेंटी-२० - १ फेब्रुवारी, अहमदाबाद
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"