IND vs NZ, 2nd ODI : कमाल आहे! अपयशी रिषभ पंतला संधीवर संधी, ३६ धावा करूनही संजू सॅमसनवर फुल्ली; कारण काय तर... 

IND vs NZ, 2nd ODI : १५, ११, ६, ६, ३, २७.... द ग्रेट रिषभ पंतची मागील सहा आंतरराष्ट्रीय सामन्यांतील कामगिरी... इंग्लंडमध्ये शतक झळकावून पाच महिने झाले आणि त्या पुण्याईवर रिषभ वन डे संघात कायम आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: November 27, 2022 08:04 AM2022-11-27T08:04:54+5:302022-11-27T08:17:47+5:30

whatsapp join usJoin us
IND vs NZ, 2nd ODI : A failed Rishabh Pant gets chance, but Sanju Samson ingnor again, reason he can't bowl & he is not lefthanded batsman | IND vs NZ, 2nd ODI : कमाल आहे! अपयशी रिषभ पंतला संधीवर संधी, ३६ धावा करूनही संजू सॅमसनवर फुल्ली; कारण काय तर... 

IND vs NZ, 2nd ODI : कमाल आहे! अपयशी रिषभ पंतला संधीवर संधी, ३६ धावा करूनही संजू सॅमसनवर फुल्ली; कारण काय तर... 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs NZ, 2nd ODI : १५, ११, ६, ६, ३, २७.... द ग्रेट रिषभ पंतची मागील सहा आंतरराष्ट्रीय सामन्यांतील कामगिरी... इंग्लंडमध्ये शतक झळकावून पाच महिने झाले आणि त्या पुण्याईवर रिषभ वन डे संघात कायम आहे. ट्वेंटी-२०त तर त्याच्या सातत्याबाबत न बोललेलं बरं... पण, तरीही तो संघात हवा कारण तो डावखुरा फलंदाज आहे... मग त्याची यष्टिंमागील कामगिरी कितीही सुमार, टुकार झाली असेल तरी चालेल.. संघाची घडी बसवण्यासाठी आम्हाला डावखुरा फलंदाज हवा... आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय संघ डावखुऱ्या फलंदाजासह खेळले नसावेत, असा समज टीम इंडियाने करून घेतलेला दिसतोय... पण, याचा परिणाम संजू सॅमसनच्या ( Sanju Samson) कारकीर्दिवर होतोय, याची जाण संघ व्यवस्थापनाला नसावी याचं आश्चर्य वाटते.

मिशन २०२३ वर्ल्ड कप! २१ सामने अन् १५ जागांसाठी ३१ खेळाडू शर्यतीत; टॉप ऑर्डर ते गोलंदाजी

भारतीय संघाने दोन बदल केले; एक मॅच खेळवून Sanju Samson ला बाकावर बसवले, दोन दीपक परतले

पहिल्या वन डे सामन्यात हार मानावी लागल्यानंतर भारतीय संघ मालिका वाचवण्याच्या निर्धाराने आज मैदानावर उतरला.  सूर्यकुमार यादव व रिषभ पंत यांच्याकडून आज संघाला अपेक्षा असतील.... पहिल्या सामन्यात दोघांना अपयश आले होते. पण, संजू सॅमसनने पाचव्या विकेटसाठी श्रेयस अय्यरसह चांगली भागीदारी करूनही त्याला पुन्हा बाकावर बसवले गेले. संजूला एव्हाना याची सवय झाली आहे. २०१५मध्ये ट्वेंटी-२०त पदार्पण करूनही त्याच्या वाट्याला १६ सामने आले, उलट त्याच्या नंतर आलेले इशान किशन व रिषभ पंत केवळ लेफ्टी असून जास्त सामने खेळले... लेफ्टी-राईटी हा क्रायटेरीया पाहायला आणि संघाचे संतुलन राखायला चांगला वाटत असला तरी त्यामुळे संजूवर किती काय अन्याय करायचा याचे भान आता व्यवस्थापनाने राखायला हवे.

ट्वेंटी-२० संघाचा भावी कर्णधार हार्दिक पांड्या याने अष्टपैलू खेळाडूंवर जोर असणार असल्याचे विधान केले आणि त्याला धरून संजूवर अन्याय करण्याची आणखी एक संधी व्यवस्थापनाला मिळाली. अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, आर अश्विन आणि आता दीपक हुडा हे अष्टपैलू संघात असल्यामुळे संजूला संधी मिळणे तसेही अवघड आहे. याची प्रचिती आज आलीच दीपक हुडासाठी संजूला जागा खाली करावी लागली. पण, संजू गोलंदाजीही करू शकतो असा व्हिडीओ समोर आला आहे. आता संजूने आणखी काय करायला हवं हे BCCI ने एकदा स्पष्ट करायला हवं. लेफ्टी नसणं आणि गोलंदाजी करता न येणं हा संजूचा दोष नाही तर तो BCCI च्या सिस्टमचा व विचारसरणीचा दोष आहे...


दोन वर्ल्ड कप स्पर्धेत प्रयोग करून तोंडावर आपटल्यानंतरही निवड समीती, बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाचे डोळे उघडत नसतील तर त्याला संजू  काहीच करू शकत नाही. तो त्याची खंत बोलून दाखवत नसला तरी चेहऱ्यावरील भाव हे सर्व काही सांगून जातात.. 
 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: IND vs NZ, 2nd ODI : A failed Rishabh Pant gets chance, but Sanju Samson ingnor again, reason he can't bowl & he is not lefthanded batsman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.