IND vs NZ, 2nd ODI : २९-२९ षटकांचा सामना, दोन डावांत १० मिनिटांचा ब्रेक; जाणून घ्या महत्त्वाच्या अपडेट्स

IND vs NZ, 2nd ODI : पहिल्या वन डे सामन्यात हार मानावी लागल्यानंतर भारतीय संघ मालिका वाचवण्याच्या निर्धाराने आज मैदानावर उतरला.  अष्टपैलू दीपक हुडा आणि दीपक चहर यांना संधी मिळाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 11:12 AM2022-11-27T11:12:31+5:302022-11-27T11:12:52+5:30

whatsapp join usJoin us
IND vs NZ, 2nd ODI :  Good news in Hamilton. Play set to get underway at 11.10am IST, with the match reduced to 29 overs per side   | IND vs NZ, 2nd ODI : २९-२९ षटकांचा सामना, दोन डावांत १० मिनिटांचा ब्रेक; जाणून घ्या महत्त्वाच्या अपडेट्स

IND vs NZ, 2nd ODI : २९-२९ षटकांचा सामना, दोन डावांत १० मिनिटांचा ब्रेक; जाणून घ्या महत्त्वाच्या अपडेट्स

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs NZ, 2nd ODI : भारतीय संघाने आजच्या सामन्यात दोन महत्त्वाचे बदल केले. पण, त्यांनी पुन्हा एकदा संजू सॅमसनला बाकावर बसवले. शिखर धवन व शुबमन गिल यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिल. दोन अडीच तासांनंतर पावसाने आता विश्रांती घेतली आहे. सूर्यकुमार यादवने ग्राऊंड स्टाफसोबत गाडीतून खेळपट्टीवर फेरफटकाही मारला. पण, सामना सुरू कधी होणार...

पहिल्या वन डे सामन्यात हार मानावी लागल्यानंतर भारतीय संघ मालिका वाचवण्याच्या निर्धाराने आज मैदानावर उतरला.  अष्टपैलू दीपक हुडा आणि दीपक चहर यांना संधी मिळाली आहे. संजू सॅमसन व शार्दूल ठाकूर यांना आज वगळले आहे. शिखर धवन व शुबमन गिल यांनी टीम इंडियाला पुन्हा सकारात्मक सुरूवात करून दिली. या दोघांनी ४.५ षटकांत २२ धावा फलकावर चढवल्या अन् जोरदार पाऊस सुरू झाला.  पावसामुळेच हा सामना थोडा उशीरा सुरू झाला होता. दोन तासांहून अधिक काळ पावसाची बॅटिंग सुरूच होती. दोन अडीच तासानंतर पाऊस थांबला आहे आणि कव्हर्सही हटवले गेले आहेत. १०.१५ वाजता खेळपट्टीची पाहणी केली जाईल आणि त्यानंतर निर्णय होणार होता. पण, अम्पायर मैदानावर पाहणी करायला आले आणि पुन्हा पाऊस सुरू झाला. पण यावेळी पावसाने लगेच विश्रांती घेतली आणि ११ वाजत पाहणी झाली.
 


त्यानुसार २९-२९ षटकांचा सामना खेळवण्याचा निर्णय झाला आहे. 

Web Title: IND vs NZ, 2nd ODI :  Good news in Hamilton. Play set to get underway at 11.10am IST, with the match reduced to 29 overs per side  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.