Join us  

IND vs NZ, 2nd ODI : भारतीय संघाने दोन बदल केले; एक मॅच खेळवून Sanju Samson ला बाकावर बसवले, दोन दीपक परतले

IND vs NZ, 2nd ODI : पहिल्या वन डे सामन्यात हार मानावी लागल्यानंतर भारतीय संघ मालिका वाचवण्याच्या निर्धाराने आज मैदानावर उतरली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 7:06 AM

Open in App

IND vs NZ, 2nd ODI : पहिल्या वन डे सामन्यात हार मानावी लागल्यानंतर भारतीय संघ मालिका वाचवण्याच्या निर्धाराने आज मैदानावर उतरली. न्यूझीलंडचा अनुभव हा पहिल्या वन डेत भारी पडल्यानंतर शिखर धवनने आज संघात दोन बदल केले. भारतीय संघाला पहिल्या वन डेत ३००+ धावा करूनही हार मानावी लागली होती, उम्रान मलिक व अर्शदीप सिंग यांनी पदार्पणात चांगली कामगिरी केली, परंतु अनुभव कमी पडला. त्यामुळे आज  भारताने प्लेइंग इलेव्हनमधील संतुलन राखत बदल केले आणि भारतीय संघ प्रथम फलंदाजीला येणार आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाने आयसीसी क्रमवारीत भारताला मोठा फटका बसला आणि दोन रेटींग गुण कमी झाल्याने त्यांची चौथ्या स्थानी घसरण झाली. न्यूझीलंड व इंग्लंड अव्वल दोन स्थानावर कायम आहेत. ऑस्ट्रेलिया ११२ रेटींग गुणासह तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्यामुळे भारताला उर्वरित दोन सामने जिंकून पुन्हा क्रमवारीत सुधारणा करण्याची संधी आहे. सूर्यकुमार यादव व रिषभ पंत यांच्याकडून आज संघाला अपेक्षा असतील.... पहिल्या सामन्यात दोघांना अपयश आले होते. पण, संजू सॅमसनने पाचव्या विकेटसाठी श्रेयस अय्यरसह चांगली भागीदारी करूनही त्याला पुन्हा बाकावर बसवले गेले.

पहिल्या सामन्यात भारताला एका गोलंदाजाची उणीव जाणवली आणि म्हणूनच आज संजूच्या जागी दीपक हुडाला संधी दिली गेली आहे. ट्वेंटी-२०त त्याने एका सामन्यात चार विकेट्स घेतल्या होत्या. शार्दूल ठाकूर पहिल्या सामन्यात महागडा ठरला होता. टॉम लॅथमने त्याच्या एका षटकात २५ धावा चोपून सामनाच फिरवला होता. त्यामुळे त्यालाही आज बसवण्यात आले आणि दीपक चहरचे  पुनरागमन झाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडसंजू सॅमसन
Open in App