Join us  

IND vs NZ 2nd ODI : मोठी बातमी : दुसऱ्या वन डेपूर्वी टीम इंडियाला ICC ने दिला दणका; रोहित शर्मावर बंदीची टांगती तलवार

India vs New Zealand, 2nd ODI : भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 1:38 PM

Open in App

India vs New Zealand, 2nd ODI : भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. शुभमन गिलच्या द्विशतकाच्या जोरावर भारताने ३४९ धावांचा डोंगर उभा केला. मायकेल ब्रेसवेलने १४४ धावांची खेळी करताना न्यूझीलंडसाठी अखेरच्या षटकापर्यंत खिंड लढवली. भारताने १२ धावांनी हा सामना जिंकला अन् आता दुसऱ्या वन डे साठी खेळाडू रायपूर येथे दाखल झाले आहे. शनिवारी होणाऱ्या दुसऱ्या लढतीपूर्वी ICC ने भारताला दणका दिला आहे. 

SRH ची मालकीण काव्या मारनला Live Match मध्ये दक्षिण आफ्रिकन चाहत्याकडून लग्नाची मागणी, Video 

हैदराबाद येथे झालेल्या पहिल्या वन डे सामन्यात षटकांची गती संथ ठेवल्यामुळे ICC ने संघाच्या मॅच फीमधील ६० टक्के रक्कम दंड म्हणून कापली आहे. आयसीसीच्या मॅच रेफरीच्या एलिट पॅनलचे प्रमुख जवागल श्रीनाथ यांनी ही कारवाई केली. आयसीसीच्या नियम क्रमांक २.२२ नुसार दिलेल्या वेळेत षटक पूर्ण न केल्यास प्रत्येक षटकामागे खेळाडू, सपोर्ट स्टाफ यांच्या मॅच फी मधील २० टक्के रक्कम कापली जाते. त्यानुसार भारतीय संघाला ६० टक्के मॅच फीचा दंड सुनावण्यात आला आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने हा निर्णय मान्य केला आहे.  दुसऱ्या सामन्यातही षटकांची गती संथ राहिल्यास कर्णधारावर एका सामन्याच्या बंदीची कारवाई होऊ शकते.

रोहित शर्माचं कर्णधारपद जाणाररोहित शर्मा आगामी आयसीसी वन डे वर्ल्ड कप २०२३ संपेपर्यंतच कर्णधारपदावर राहील. या जागतीक स्पर्धेत रोहित टीम इंडियाचे नेतृत्व करेल. तसेच या स्पर्धेसोबतच तो आपल्या कर्णधारपदाचा कार्यकाळही संपवेल. इनसाईड स्पोर्टने एका वृत्तात म्हटले आहे की, रोहित शर्मा या वर्षाच्या अखेरपर्यंतच वन डे संघाचे नेतृत्व करेल. याशिवाय, तो कसोटी संघाचे नेतृत्व करत राहील, अशी आस बीसीसीआयला आहे. मात्र, त्याच्या कसोटी कर्णधारपदासंदर्भातील निर्णय वन डे वर्ल्ड कपनंतरच घेतला जाईल. यातच, केएल राहुल कसोटी संघाचे कर्णधारपद सांभाळण्याच्या शर्यतीत सर्वात पुढे आहे. याशिवाय, नवनियुक्त उपकर्णधार हार्दिक पांड्याही पुढील वर्षी होणाऱ्या  ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपर्यंत कर्णधारपदावर राहील. 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडरोहित शर्माआयसीसी
Open in App