IND vs NZ, 2nd ODI : मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघाची धडपड सुरू आहे. पहिल्या वन डे सामन्यात ३००+ धावा करूनही न्यूझीलंडने कर्णधार केन विलियम्सन व टॉम लॅथम यांच्या विक्रमी २२१ धावांच्या भागीदारीच्या जोरावर विजय मिळवला. त्यामुळेच भारतीय संघाने आजच्या सामन्यात दोन महत्त्वाचे बदल केला. पण, त्यांनी पुन्हा एकदा संजू सॅमसनला बाकावर बसवले. शिखर धवन व शुबमन गिल यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली, परंतु मागली दीड-दोन तास सामना थांबला आहे आणि BCCI ने त्याबाबतचे अपडेट्स दिले आहेत.
कमाल आहे! अपयशी रिषभ पंतला संधीवर संधी, ३६ धावा करूनही संजू सॅमसनवर फुल्ली; कारण काय तर...
पहिल्या वन डे सामन्यात हार मानावी लागल्यानंतर भारतीय संघ मालिका वाचवण्याच्या निर्धाराने आज मैदानावर उतरला. सूर्यकुमार यादव व रिषभ पंत यांच्याकडून आज संघाला अपेक्षा असतील.... पहिल्या सामन्यात दोघांना अपयश आले होते. पण, संजू सॅमसनने पाचव्या विकेटसाठी श्रेयस अय्यरसह चांगली भागीदारी करूनही त्याला पुन्हा बाकावर बसवले गेले. अष्टपैलू दीपक हुडा आणि दीपक चहर यांना संधी मिळाली आहे. शार्दूल ठाकूर याला आज वगळले आहे.
- न्यूझीलंडचा संघ - फिन अॅलन, डेव्हॉन कॉनवे, केन विलियम्सन, डॅरील मिचेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, मिचेल ब्रेसवेल, मॅट हेन्री, टीम साऊदी, ल्युकी फर्ग्युसन
- भारताचा संघ - शिखर धवन, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, उम्रान मलिक, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल
शिखर धवन व शुबमन गिल यांनी टीम इंडियाला पुन्हा सकारात्मक सुरूवात करून दिली. या दोघांनी ४.५ षटकांत २२ धावा फलकावर चढवल्या अन् जोरदार पाऊस सुरू झाला. पावसामुळेच हा सामना थोडा उशीरा सुरू झाला होता. दोन तासांहून अधिक काळ पावसाची बॅटिंग सुरूच आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारतीय संघाचे ११२ रेटिंग गुण होते आणि ते तिसऱ्या क्रमांकावर होते. ऑस्ट्रेलियाच्या खात्यातही ११२ रेटिंग गुण होते. पण, न्यूझीलंडविरुद्ध पहिली वन डे गमावल्यानंतर भारताचे रेटिंग गुण कमी झाले आणि ते चौथ्या क्रमांकावर सरकले. भारतीय संघ ११० रेटिंग गुणांसह चौथ्या स्थानावर आला आहे. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या क्रमांकावर पकड मजबूत केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"