IND vs NZ, 2nd ODI Live : भारतीय संघाने आणखी एक वन डे मालिका जिंकली; पोरांनी वन डे वर्ल्ड कपसाठी सॉलिड तयारी केली 

India vs New Zealand, 2nd ODI Live : भारतीय संघाने २०२३ मधील दुसरी वन डे मालिका जिंकली.  वन डे वर्ल्ड कपच्या तयारीच्या दृष्टीने भारतीय संघासाठी सातत्यपूर्ण कामगिरी महत्त्वाची आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 06:27 PM2023-01-21T18:27:47+5:302023-01-21T18:28:59+5:30

whatsapp join usJoin us
IND vs NZ, 2nd ODI Live : IIndia won the ODI series against World number 1 New Zealand, won by 8 wickets | IND vs NZ, 2nd ODI Live : भारतीय संघाने आणखी एक वन डे मालिका जिंकली; पोरांनी वन डे वर्ल्ड कपसाठी सॉलिड तयारी केली 

IND vs NZ, 2nd ODI Live : भारतीय संघाने आणखी एक वन डे मालिका जिंकली; पोरांनी वन डे वर्ल्ड कपसाठी सॉलिड तयारी केली 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs New Zealand, 2nd ODI Live : भारतीय संघाने २०२३ मधील दुसरी वन डे मालिका जिंकली.  वन डे वर्ल्ड कपच्या तयारीच्या दृष्टीने भारतीय संघासाठी सातत्यपूर्ण कामगिरी महत्त्वाची आहे. गोलंदाजांच्या कामगिरीमुळे भारताला आजचा सामना सहज जिंकता आला. रोहित शर्माने अर्धशतकी खेळी करून विजयात हातभार लावला अन् भारताने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. जागतिक क्रमवारीत नंबर १ असलेल्या न्यूझीलंडला भारताने पराभूत केले. घरच्या मैदानावरील मागील २४ मालिकांमधील भारताचा हा २२ वा मालिका विजय आहे.  

युवा फॅन मैदानावर शिरला अन् रोहित शर्माला मारली मिठी, त्यानंतर कॅप्टनच्या कृतीने जिंकले मन


नाणेफेक जिंकून रोहित शर्माने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मोहम्मद शमीने पहिल्याच षटकात धक्का दिल्यानंतर मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर व हार्दिक पांड्या यांनी धक्के दिले. न्यूझीलंडचा निम्मा संघ १५ धावांवर माघारी पाठवला. ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल व मिचेल सँटरन यांनी संघर्ष करताना न्यूझीलंडला शतकी पल्ला पार करून दिला. पण, भारतीय गोलंदाज आज कमालीच्या फॉर्मात दिसले अन् त्यांनी किवींचा डाव १०८ धावांत गुंडाळला. शमीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. 


पहिल्या वन डे सामन्यातील शतकवीर मायकेल ब्रेसवेल व ग्लेन फिलिफ्स यांनी ४१ धावांची भागीदारी करताना न्यूझीलंडची गाडी रुळावर आणली होती. ब्रेसवेल २२ धावांवर माघारी परतला. फिलिप्स व मिचेल सँटनर ही जोडी भारताची डोकेदुखी वाढवेल असे चित्र दिसत असताना हार्दिकने विकेट मिळवून दिली. सँटनरला ( २७) त्रिफळाचीत करून हार्दिकने ४७ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. फिलिप्स ३६ धावांवर माघारी परतला.न्यूझीलंडचा संपूर्ण संघ १०८ धावांत माघारी पाठवला. हार्दिक व वॉशिंग्टन यांनी प्रत्येकी २, तर शार्दूल व कुलदीप यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

न्यूझीलंडने समोर ठेवलेल्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा व शुभमन गिल या जोडीला फार कष्ट घ्यावे लागले नाही. धावा सहजतेने त्यांच्या बॅटीतून निघत होत्या आणि या दोघांनी चौथ्यांदा अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. रोहितची फटकेबाजी आज पाहण्यासारखी होती. कर्णधार म्हणून रोहितने वन डे क्रिकेटमध्ये आज १००० धावा पूर्ण केल्या.  रोहित शर्माने ५० चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ५१ धावा करताना भारताच्या विजयाचा पाया मजबूत केला. विराट कोहली पुन्हा एकदा मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर फसला अन् यष्टिचीत होऊन ११ धावांवर माघारी परतला. शुभमन ४० धावांवर नाबाद राहिला अन् भारताने ८ विकेट्स राखून सामना जिंकला. भारताने २०.१ षटकांत २ बाद १११ धावा करून विजय मिळवला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

Web Title: IND vs NZ, 2nd ODI Live : IIndia won the ODI series against World number 1 New Zealand, won by 8 wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.