India vs New Zealand, 2nd ODI Live : शुभमन गिलच्या ( Shubman Gill) द्विशतकाने पहिला वन डे सामना गाजवला, परंतु मायकेल ब्रेसवेलनेही शतकी खेळी करताना भारताला कडवी टक्कर दिली. त्यामुळे आज होणाऱ्या दुसऱ्या वन डे सामन्यात कोण बाजी मारेल याची उत्सुकता सर्वांनाच आहे. आजच्या सामन्यात रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये काय बदल करतो, हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. भारताच्या जलदगती गोलंदाजांनी २०२२ मध्ये वन डे क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवले आहे. २८ सामन्यांत १३६ विकेट्स घेत भारत अव्वल स्थानावर आहे.
- भारताने घरच्या मैदानावरील मागील १२ वन डे सामन्यात ११ विजय मिळवले आहेत. - मिचेल सँटनर आणि विराट कोहली यांच्यातील वन डेतील आकडेवारी ३४.१ षटकांत २/१४५ धावा अशी आहे- शार्दूल टाकूरने १८ चेंडूंत २ वेळा फिन अॅलनला बाद केले आहे आणि ७ धावा दिल्या आहेत.
टीम इंडियाने २०१० पासून घरच्या मैदानावर २५ मालिका खेळल्या आहेत. ज्यामध्ये २२ मालिकांमध्ये यश मिळवले आहे, तर केवळ तीन वेळा अपयश आले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ रायपूर येथे वन डे सामना जिंकू २३ वी मालिका जिंकण्याची भारताला संधी आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि संघात कोणताच बदल केला नाही.
भारत - रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, वॉशिंग्टन सुंदर
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"