IND vs NZ, 2nd ODI Live : भारतीय गोलंदाजानी मजबूत फास आवळला, ५ बाद १५ वरून न्यूझीलंडने शतकी पल्ला पार केला

India vs New Zealand, 2nd ODI Live : भारताने पहिल्या दुसऱ्या सामन्यातही वर्चस्व गाजवेलेले पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 04:12 PM2023-01-21T16:12:07+5:302023-01-21T16:13:21+5:30

whatsapp join usJoin us
IND vs NZ, 2nd ODI Live : India needs 109 runs to win the ODI series against New Zealand, Indian bowling unit has been fantastic. | IND vs NZ, 2nd ODI Live : भारतीय गोलंदाजानी मजबूत फास आवळला, ५ बाद १५ वरून न्यूझीलंडने शतकी पल्ला पार केला

IND vs NZ, 2nd ODI Live : भारतीय गोलंदाजानी मजबूत फास आवळला, ५ बाद १५ वरून न्यूझीलंडने शतकी पल्ला पार केला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs New Zealand, 2nd ODI Live : भारताने पहिल्या दुसऱ्या सामन्यातही वर्चस्व गाजवेलेले पाहायला मिळत आहे. मोहम्मद शमीने पहिल्याच षटकात धक्का दिल्यानंतर मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर व हार्दिक पांड्या यांनी धक्के दिले. न्यूझीलंडचा निम्मा संघ १५ धावांवर माघारी पाठवला. ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल व मिचेल सँटरन यांनी संघर्ष करताना न्यूझीलंडला शतकी पल्ला पार करून दिला. पण, भारतीय गोलंदाज आज कमालीच्या फॉर्मात दिसले अन् त्यांनी किवींचा डाव कमी धावांत गुंडाळला. 


भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.  मोहम्मद शमीने पहिल्याच चेंडूवर किवींना धक्का दिला. पहिले चार चेंडू वेगवेगळ्या शैलीचे फेकल्यानंतर शमीने पाचवा चेंडू भन्नाट वळवला अन् फिन अ‌ॅलनला काही कळण्याआधी यष्टिंवर आदळला. किवींना शून्य धावांवर पहिला धक्का बसला. वन डे क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावरील शमीची ५० वी विकेट ठरली अन् अशी कामगिरी करणारा तो भारताचा १५ वा गोलंदाज ठरला. मोहम्मद सिराजने सहाव्या षटकात किवींना दुसरा धक्का देताना हेन्री निकोल्सला ( २) माघारी पाठवले. 

त्यानंतर शमीने स्वतःच्याच गोलंदाजीवर डॅरिल मिचेलचा (२) रिटर्न झेल घेतला. ८ षटकानंतर कर्णधार रोहितने गोलंदाजीत बदल केला. हार्दिकने त्याच्या पहिल्याच षटकात विकेट मिळवली. सलामीवीर डेव्हॉन कॉनवेने मारलेला सरळ फटका हार्दिकने डाव्या हाताने अप्रतिमरित्या टिपला. किवी फलंदाजालाही यावर विश्वास बसेनासा झाला. त्यानंतर शार्दूलने कर्णधार टॉम लॅथमला ( १) माघारी पाठवले अन् किवींची अवस्था ५ बाद १५ अशी दयनीय केली. 


पहिल्या वन डे सामन्यातील शतकवीर मायकेल ब्रेसवेल व ग्लेन फिलिफ्स यांनी ४१ धावांची भागीदारी करताना न्यूझीलंडची गाडी रुळावर आणली होती. ही जोडी तोडण्यासाठी रोहितने पुन्हा गोलंदाजीत बदल केला अन् दोन विकेट्स घेणाऱ्या शमीला आणले. शमीने पहिल्या दोन चेंडूंवर ब्रेसवेलला चौकार मारू दिले अन् तिसरा चेंडू बाऊन्सर फेसला. ब्रेसवेल त्यावरही फटका मारण्यासाठी गेला अन् चेंडू बॅटला घासून यष्टिरक्षक इशान किशनच्या हाती विसावला. ब्रेसवेल २२ धावांवर माघारी परतला. फिलिप्स व मिचेल सँटनर ही जोडी भारताची डोकेदुखी वाढवेल असे चित्र दिसत असताना हार्दिकने विकेट मिळवून दिली. सँटनरला ( २७) त्रिफळाचीत करून हार्दिकने ४७ धावांची भागीदारी संपुष्टात आणली.  

फिलिप्सने आता आक्रमक फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला अन् रोहितने वॉशिंग्टन सुंदरला गोलंदाजीला आणले. तिथेच फिलिप्स फसला अन्  सुंदरच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादवच्या हाती सोपा झेल देऊन ३६ धावांवर माघारी परतला. सुंदरने त्याच्या पुढच्या षटकात लॉकी फर्ग्युसनलाही ( १) फिलिप्सप्रमाणेच बाद केले. कुलदीप यादवने अखेरची विकेट घेत न्यूझीलंडचा संपूर्ण संघ १०८ धावांत माघारी पाठवला. शमीने ३, हार्दिक, वॉशिंग्टन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: IND vs NZ, 2nd ODI Live : India needs 109 runs to win the ODI series against New Zealand, Indian bowling unit has been fantastic.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.