India vs New Zealand, 2nd ODI Live : भारताने पहिल्या दुसऱ्या सामन्यातही वर्चस्व गाजवेलेले पाहायला मिळत आहे. मोहम्मद शमीने पहिल्याच षटकात धक्का दिल्यानंतर मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर व हार्दिक पांड्या यांनी धक्के दिले. न्यूझीलंडचा निम्मा संघ १५ धावांवर माघारी पाठवला. ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल व मिचेल सँटरन यांनी संघर्ष करताना न्यूझीलंडला शतकी पल्ला पार करून दिला. पण, भारतीय गोलंदाज आज कमालीच्या फॉर्मात दिसले अन् त्यांनी किवींचा डाव कमी धावांत गुंडाळला.
त्यानंतर शमीने स्वतःच्याच गोलंदाजीवर डॅरिल मिचेलचा (२) रिटर्न झेल घेतला. ८ षटकानंतर कर्णधार रोहितने गोलंदाजीत बदल केला. हार्दिकने त्याच्या पहिल्याच षटकात विकेट मिळवली. सलामीवीर डेव्हॉन कॉनवेने मारलेला सरळ फटका हार्दिकने डाव्या हाताने अप्रतिमरित्या टिपला. किवी फलंदाजालाही यावर विश्वास बसेनासा झाला. त्यानंतर शार्दूलने कर्णधार टॉम लॅथमला ( १) माघारी पाठवले अन् किवींची अवस्था ५ बाद १५ अशी दयनीय केली.
फिलिप्सने आता आक्रमक फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला अन् रोहितने वॉशिंग्टन सुंदरला गोलंदाजीला आणले. तिथेच फिलिप्स फसला अन् सुंदरच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादवच्या हाती सोपा झेल देऊन ३६ धावांवर माघारी परतला. सुंदरने त्याच्या पुढच्या षटकात लॉकी फर्ग्युसनलाही ( १) फिलिप्सप्रमाणेच बाद केले. कुलदीप यादवने अखेरची विकेट घेत न्यूझीलंडचा संपूर्ण संघ १०८ धावांत माघारी पाठवला. शमीने ३, हार्दिक, वॉशिंग्टन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"