Join us  

IND vs NZ, 2nd ODI Live : ५ बाद १५ धावा! हार्दिक पांड्याने अविश्वसनीय झेल घेतला, जगभरात आता त्याचीच हवा; Video 

मोहम्मद शमीने पहिल्याच षटकात धक्का दिल्यानंतर मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर व हार्दिक पांड्या यांनी धक्के दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 2:43 PM

Open in App

India vs New Zealand, 2nd ODI Live : भारताने पहिल्या वन डे सामन्यात रोमहर्षक विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आणि दुसऱ्या सामन्यातही वर्चस्व गाजवेलेले पाहायला मिळत आहे. मोहम्मद शमीने पहिल्याच षटकात धक्का दिल्यानंतर मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर व हार्दिक पांड्या यांनी धक्के दिले. न्यूझीलंडचा निम्मा संघ १५ धावांवर माघारी पाठवला. हार्दिकने ( Hardik Pandya) अविश्वसनीय झेल घेत किवींना सर्वात मोठा धक्का दिला.  

नाणेफेक जिंकली अन् १३ सेकंद रोहित शर्मा झाला 'ब्लँक'! काय करावं हेच सूचेना, चाहते टेंशनमध्ये, Video

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.  मोहम्मद शमीने पहिल्याच चेंडूवर किवींना धक्का दिला. पहिले चार चेंडू वेगवेगळ्या शैलीचे फेकल्यानंतर शमीने पाचवा चेंडू भन्नाट वळवला अन् फिन अ‌ॅलनला काही कळण्याआधी यष्टिंवर आदळला. किवींना शून्य धावांवर पहिला धक्का बसला. वन डे क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावरील शमीची ५० वी विकेट ठरली अन् अशी कामगिरी करणारा तो भारताचा १५ वा गोलंदाज ठरला. मोहम्मद सिराजने सहाव्या षटकात किवींना दुसरा धक्का देताना हेन्री निकोल्सला ( २) माघारी पाठवले. 

त्यानंतर शमीने स्वतःच्याच गोलंदाजीवर डॅरिल मिचेलचा (२) रिटर्न झेल घेतला. ८ षटकानंतर कर्णधार रोहितने गोलंदाजीत बदल केला. हार्दिकने त्याच्या पहिल्याच षटकात विकेट मिळवली. सलामीवीर डेव्हॉन कॉनवेने मारलेला सरळ फटका हार्दिकने डाव्या हाताने अप्रतिमरित्या टिपला. किवी फलंदाजालाही यावर विश्वास बसेनासा झाला. त्यानंतर शार्दूलने कर्णधार टॉम लॅथमला ( १) माघारी पाठवले अन् किवींची अवस्था ५ बाद १५ अशी दयनीय केली. 

 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडहार्दिक पांड्यामोहम्मद शामीमोहम्मद सिराजशार्दुल ठाकूर
Open in App