IND vs NZ, 2nd ODI Live : नाणेफेक जिंकली अन् १३ सेकंद रोहित शर्मा झाला 'ब्लँक'! काय करावं हेच सूचेना, चाहते टेंशनमध्ये, Video

India vs New Zealand, 2nd ODI Live : आजच्या सामन्यात रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये काय बदल करतो, हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 01:26 PM2023-01-21T13:26:11+5:302023-01-21T13:30:53+5:30

whatsapp join usJoin us
IND vs NZ, 2nd ODI Live : Rohit Sharma has won the toss and has forgotten what to do. He finally decides, Video   | IND vs NZ, 2nd ODI Live : नाणेफेक जिंकली अन् १३ सेकंद रोहित शर्मा झाला 'ब्लँक'! काय करावं हेच सूचेना, चाहते टेंशनमध्ये, Video

IND vs NZ, 2nd ODI Live : नाणेफेक जिंकली अन् १३ सेकंद रोहित शर्मा झाला 'ब्लँक'! काय करावं हेच सूचेना, चाहते टेंशनमध्ये, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs New Zealand, 2nd ODI Live : शुभमन गिलच्या ( Shubman Gill) द्विशतकाने पहिला वन डे सामना गाजवला, परंतु मायकेल ब्रेसवेलनेही शतकी खेळी करताना भारताला कडवी टक्कर दिली. त्यामुळे आज होणाऱ्या दुसऱ्या वन डे सामन्यात कोण बाजी मारेल याची उत्सुकता सर्वांनाच आहे. आजच्या सामन्यात रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये काय बदल करतो, हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. भारताच्या जलदगती गोलंदाजांनी २०२२ मध्ये वन डे क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवले आहे. २८ सामन्यांत १३६ विकेट्स  घेत भारत अव्वल स्थानावर आहे. नाणेफेक जिंकल्यावर एक मजेशीर प्रसंग घडला... १३ सेकंद रोहित ब्लँक झाला.. . नेमका काय निर्णय घ्यावा हेच त्याला सूचेना झालं... 

भारतीय संघाने नाणेफेक जिंकली, जाणून घ्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काय केले बदल...


टीम इंडियाने २०१० पासून घरच्या मैदानावर २५ मालिका खेळल्या आहेत. ज्यामध्ये २२ मालिकांमध्ये यश मिळवले आहे, तर केवळ तीन वेळा अपयश आले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ रायपूर येथे वन डे सामना जिंकू २३ वी मालिका जिंकण्याची भारताला संधी आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि संघात कोणताच बदल केला नाही. न्यूझीलंडच्या संघातही कोणताच बदल झालेला नाही. 

भारत - रोहित शर्मा, शुभमन गिल,  विराट कोहली, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, वॉशिंग्टन सुंदर 

रोहित काय म्हणाला, काय निर्णय घ्यायचाय हेच मी काही काळासाठी विसरलो होतो. नाणेफेक जिंकल्यावर काय निर्णय घ्यायचा याबाबत संघासोबत बरीच चर्चा झाली होती. आम्हाला आव्हानात्मक परिस्थितीसाठी तयार राहायचे आहे. त्यामुळे प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतो.   

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

Web Title: IND vs NZ, 2nd ODI Live : Rohit Sharma has won the toss and has forgotten what to do. He finally decides, Video  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.