India vs New Zealand, 2nd ODI Live : न्यूझीलंडने समोर ठेवलेल्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा व शुभमन गिल या जोडीला फार कष्ट घ्यावे लागले नाही. धावा सहजतेने त्यांच्या बॅटीतून निघत होत्या आणि या दोघांनी चौथ्यांदा अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. रोहितची फटकेबाजी आज पाहण्यासारखी होती. कर्णधार म्हणून रोहितने वन डे क्रिकेटमध्ये आज १००० धावा पूर्ण केल्या. १०व्या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेकदरम्यान एक तरुण सुरक्षा कर्मचाऱ्यांना चकवून स्टेडियममध्ये शिरला अन् त्याने रोहितला मिठी मारली. त्यानंतर सुरक्षा कर्मचारी त्याला पकडण्यासाठी धावले अन् रोहितने त्यांना लहान मुलगा आहे त्याला सोडा असे सांगितले.
नाणेफेक जिंकून रोहित शर्माने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मोहम्मद शमीने पहिल्याच षटकात धक्का दिल्यानंतर मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर व हार्दिक पांड्या यांनी धक्के दिले. न्यूझीलंडचा निम्मा संघ १५ धावांवर माघारी पाठवला. ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल व मिचेल सँटरन यांनी संघर्ष करताना न्यूझीलंडला शतकी पल्ला पार करून दिला. पण, भारतीय गोलंदाज आज कमालीच्या फॉर्मात दिसले अन् त्यांनी किवींचा डाव १०८ धावांत गुंडाळला. शमीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
पहिल्या वन डे सामन्यातील शतकवीर मायकेल ब्रेसवेल व ग्लेन फिलिफ्स यांनी ४१ धावांची भागीदारी करताना न्यूझीलंडची गाडी रुळावर आणली होती. ब्रेसवेल २२ धावांवर माघारी परतला. फिलिप्स व मिचेल सँटनर ही जोडी भारताची डोकेदुखी वाढवेल असे चित्र दिसत असताना हार्दिकने विकेट मिळवून दिली. सँटनरला ( २७) त्रिफळाचीत करून हार्दिकने ४७ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. फिलिप्स ३६ धावांवर माघारी परतला.न्यूझीलंडचा संपूर्ण संघ १०८ धावांत माघारी पाठवला. हार्दिक व वॉशिंग्टन यांनी प्रत्येकी २, तर शार्दूल व कुलदीप यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IND vs NZ, 2nd ODI Live : Rohit Sharma told the security - "let him go, he's a kid", Great gesture by the captain!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.